राष्ट्राध्यक्ष होताच डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला निर्णय, पाकिस्तानच्या अडचणी वाढल्या; वाचा सविस्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 13:58 IST2025-01-23T13:54:03+5:302025-01-23T13:58:48+5:30
दोन दिवसापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर त्यांनी बायडेन यांच्या कार्यकाळातील निर्वासित कार्यक्रम रद्द केला.

राष्ट्राध्यक्ष होताच डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला निर्णय, पाकिस्तानच्या अडचणी वाढल्या; वाचा सविस्तर
डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली. त्यांच्या एका निर्णयामुळे पाकिस्तान अडचणीत आला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्ष होताच बायडेन यांच्या कार्यकाळातील रिफ्युजी प्रोग्रॅम रद्द केला आहे. या कार्यक्रमांतर्गत, पाकिस्तानात अडकलेल्या अफगाण निर्वासितांना अमेरिकेत स्थायिक केले जाणार होते. बायडेन प्रशासनाने पाकिस्तानला सांगितले होते की, अमेरिका थोड्याच वेळात सर्व निर्वासितांना आश्रय देईल, पण ते सत्तेत असताना हे होऊ शकले नाही. जेव्हा तालिबानने अफगाणिस्तानातील सरकार उलथवून तेथे आपले राज्य घोषित केले तेव्हा हे सर्व निर्वासित अफगाणिस्तानातून पाकिस्तानात पळून गेले होते.
"अमित शाह काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष", काँग्रेस ज्येष्ठ नेत्याची जीभ घसरली
अफगाणिस्तानातून पळून जाणाऱ्या बहुतेक निर्वासितांनी पूर्वी अमेरिकन सैन्यात काम केले होते. त्यावेळी अमेरिकेने पाकिस्तान सरकारला सांगितले होते की, या निर्वासितांना काही काळ त्यांच्या देशात जागा द्यावी आणि त्यानंतर अमेरिका त्यांना कुठेतरी स्थायिक करेल. पाकिस्तानला आशा होती की ही प्रक्रिया काही महिन्यांत पूर्ण होईल पण तसे झाले नाही.
या २५,००० अफगाण निर्वासितांना अमेरिका कधी सोडवेल याची पाकिस्तान वाट पाहत राहिला, तर डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेत येताच सर्व काही उलथवून टाकले. अशा परिस्थितीत, जर पाकिस्तानने या प्रकरणात अधिक तीव्र प्रतिक्रिया दिली, तर ट्रम्प यांचा कार्यकाळ सुरू होताच दोन्ही देशांमधील संबंध बिघडू शकतात.
तालिबान राजवटीत लोकांच्या अडचणी वाढणार
अमेरिकन सरकारच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, सुमारे १,६०० अफगाण निर्वासितांना अमेरिकेने स्थायिक होण्यास हिरवा कंदील दिला आहे. सध्या अमेरिकन सैन्यात सेवा करणाऱ्या अनेक अफगाणिस्तानी लोकांचे कुटुंब देखील या लोकांमध्ये आहेत. मात्र, ट्रम्प यांच्या या निर्णयानंतर त्यांना त्यांचे विमान तिकीट रद्द करावे लागले. हे लोक आता घाबरले आहेत कारण त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी अमेरिका समर्थित अफगाणिस्तान सरकारसाठी काम केले आहे. आता तालिबान राजवटीत हे लोक मोठ्या धोक्यात येऊ शकतात.
आतापर्यंत या प्रकरणात पाकिस्तान सरकारकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही किंवा अमेरिकेनेही काहीही सांगितले नाही. पण सूत्रांच्या माहितीनुसार, ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे पाकिस्तानची चिंता वाढली आहे.