शहरं
Join us  
Trending Stories
1
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
2
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
3
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
4
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
5
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
6
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
7
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...
8
तो कोहलीमुळं खचला! खरंच हेच असेल का पाकचा 'बब्बर शेर' प्रत्येक मॅचमध्ये 'ढेर' होण्यामागचं कारण?
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा!
10
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
11
बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव
12
८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?
13
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
14
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
15
कोणत्या धर्माचं पालन करते सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक? किती शिकलीये? जाणून घ्या
16
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
17
प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...  
18
Gulabjamun Recipe: ना मावा, ना मिल्कपावडर; घरच्या साहित्यात १५ मिनिटांत करा फर्स्ट क्लास गुलाबजाम 
19
आसिफ अली झरदारींनी काश्मीरबाबत ओकली गरळ; पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी भारताला तोडण्याची भाषा
20
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका

जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 07:29 IST

जगात सध्या नवनवीन ट्रेंड्स पॉप्युलर होत आहेत. दक्षिण कोरियात अलीकडेच नवरा किंवा बायको भाड्यानं घेण्याचा ट्रेंड मोठ्या प्रमाणात प्रचलित झाला आहे. तसाच ‘जादू की झप्पी’चा हा चीनमधला नवीन ट्रेंड.

काही अपवादवगळता सार्वजनिक ठिकाणी वर्तनाबाबतचे काही किमान संकेत जगभरात पाळले जातात. प्रेमात असलेल्या जोडप्यांची जवळीक अनेक देशांच्या नजरांना फारशी खटकत नसली, तरी पूर्वेकडले देश मात्र अशा जवळिकीबाबत अजून बऱ्यापैकी सोवळे आहेत. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी दोन पाच मिनिटांची साधी मिठी मारण्यासाठी तरुणीच तरुणांना थेट पैसे देऊ लागल्या तर? -आणि तरुणही अशी मिठी मारून मिळेल, त्याकरता अमुक इतके पैसे पडतील, असे बोर्ड घेऊन उभे राहू लागले तर? 

- सध्या निदान चीनमध्ये असं होतं आहे खरं ! जगात सध्या नवनवीन ट्रेंड्स पॉप्युलर होत आहेत. दक्षिण कोरियात अलीकडेच नवरा किंवा बायको भाड्यानं घेण्याचा ट्रेंड मोठ्या प्रमाणात प्रचलित झाला आहे. तसाच ‘जादू की झप्पी’चा हा चीनमधला नवीन ट्रेंड. ‘मॅन मम्स’ असं त्याचं नाव.

खरं तर ‘मॅन मम्स’ हा शब्द जिममध्ये जाणाऱ्या, तगडी शरीरयष्टी असणाऱ्या युवकांसाठी वापरला जातो. सध्या हेच तरुण सार्वजनिक ठिकाणी तरुणींना मिठीत घेऊन मोठ्या प्रमाणावर पैसे कमवत आहेत. 

अनेक तरुणीही राजीखुशीनं या तरुणांच्या बाहुपाशात शिरत आहेत, शिवाय त्यासाठी पैसेही मोजत आहेत. किंबहुना ही त्यांचीच मागणी आहे.  

तरुणींना का असं वाटतं आहे? त्याचीही अनेक कारणं आहेत. अनेक तरुणी वेगवेगळ्या त्रासांनी, कामाच्या, अभ्यासाच्या ओझ्यानं त्रस्त आहेत. त्यातून आपल्याला थोडा वेळ तरी शांतता लाभावी असं त्यांना वाटतं. त्यामुळे या तरुणीच बॉडीबिल्डर, दणकट तरुणांना दोन-पाच मिनिटांसाठी भाड्यानं बोलवत आहेत. 

या भाडोत्री तरुणांनी काय करायचं? - तर मेट्रो स्टेशन, बस स्टेशन, पार्क, शॉपिंग मॉल किंवा एखाद्या सार्वजनिक ठिकाणी भेटायचं आणि या तरुणींना पाच मिनिटांसाठी आलिंगन द्यायचं ! सार्वजनिक ठिकाणी यासाठी, की या भेटीतून कोणत्याही तरुणानं कुठलाही भलता अर्थ घेऊ नये आणि कोणताही अतिप्रसंग होऊ नये. या पाच मिनिटांच्या गळाभेटीचा दर आहे वीस ते पन्नास युआन ! (२५० ते ६०० रुपये.)

या तरुणी भाडोत्री तरुणांच्या केवळ बाहुपाशातच शिरत नाहीत, तर त्या आपल्या समस्याही त्यांना सांगतात. या समस्या त्यांनी सोडवाव्यात अशी त्यांची अपेक्षा नसते, तर त्या त्यांनी केवळ शांतपणे ऐकून घ्याव्यात, या तरुणींना कोणाकडे तरी आपलं मन मोकळं करता यावं, इमोशनल कम्फर्ट मिळावा, बस इतकंच ! 

यामुळे या तरुणांना एक वेगळाच रोजगारही मिळाला आहे. अनेक तरुण रस्त्याच्या कडेला पोस्टर घेऊन उभे राहतात. त्यावर लिहिलेलं असतं, पाच मिनिटांच्या गळाभेटीसाठी ४०० रुपये, ५०० रुपये, ६०० रुपये ! 

यासंदर्भात एका विद्यार्थिनीनं सोशल मीडियावर पोस्ट टाकली होती, पाच मिनिटांसाठी मी एका मित्राला मिठी मारली, त्यानंतर मला खूपच फ्रेश वाटलं आणि माझा ताण-तणाव मोठ्या प्रमाणावर निवळला. 

तिच्या या पोस्टला खूपच प्रतिसाद मिळाला आणि ही ‘हग थेरपी’ जोरात सुरू झाली ! मानवी स्पर्शातला दिलासा शोधत आपल्या एकाकीपणावर मात करू पाहणाऱ्या आधुनिक जगात सुरू झालेले हे प्रकार एका नव्या अस्वस्थ सामाजिक अवस्थेचीच चिन्हं आहेत, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

टॅग्स :World Trendingजगातील घडामोडीInternationalआंतरराष्ट्रीयchinaचीनSocialसामाजिक