शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
3
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
4
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
5
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल
6
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
7
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
8
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
9
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
10
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
11
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
12
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
13
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
14
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
15
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
16
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
17
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
18
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
19
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
20
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...

जगभर: डोनाल्ड ट्रम्प याची 'दादागिरी', अमेरिकेत भारतीय प्राध्यापकांनाही ‘बंदी’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 11:43 IST

ट्रम्प यांनी अख्ख्या जगावरच दादागिरी आणि ‘हम करे सो कायदा’ सुरू केल्यानंतर अमेरिकेत शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांवरही मोठी बंधनं लादली.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अख्ख्या जगावरच दादागिरी आणि ‘हम करे सो कायदा’ सुरू केल्यानंतर अमेरिकेत शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांवरही मोठी बंधनं लादली. ‘अमेरिका फर्स्ट’ म्हणत जगभरातील विद्यार्थ्यांसाठी त्यांनी अमेरिकेची दारं शक्य होईल तेवढी बंद करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे यंदा हजारो परदेशी विद्यार्थ्यांचं शिक्षणासाठी अमेरिकेत जाण्याचं स्वप्न भंगलं.

ही बाब केवळ विद्यार्थ्यांपुरतीच मर्यादित नाही, दरवर्षी जगभरातील तज्ज्ञ प्रोफेसर अमेरिकन विद्यापीठांत विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी जातात, त्यांचेही दरवाजे ट्रम्प यांनी बंद केले आहेत. त्यामुळे यंदा गेल्या वर्षांच्या तुलनेत भारतातून केवळ ४५ टक्के प्रोफेसरच अमेरिकेत जाऊ शकले आहेत. 

यावर्षी केवळ ३८० भारतीय प्रोफेसरांना अमेरिकेत नोकऱ्या मिळाल्या. गेल्या वर्षी हीच संख्या सातशेपेक्षा जास्त होती. परदेशी प्रोफेसरांच्या बाबतीतही हीच परिस्थिती आहे. यंदा संपूर्ण जगातून केवळ २५०० प्राध्यापकांची अमेरिकन विद्यापीठांत नियुक्ती होऊ शकली. 

गेल्या वर्षी बायडेन यांच्या काळात हीच संख्या दुपटीपेक्षाही अधिक होती. विद्यार्थ्यांबरोबरच प्राध्यापकांनाही अमेरिकेची प्रवेशद्वारे अमेरिकेने बंद केल्यामुळे संपूर्ण जगात नाराजी आहे. विशेष म्हणजे खुद्द अमेरिकन विद्यार्थ्यांनीही याबाबत नाराजी आणि संताप व्यक्त केला आहे; कारण भारतासह जगभरातील तज्ज्ञ ‘फॅकल्टी’ज अमेरिकन विद्यापीठांत शिकवत असल्यानं अमेरिकेच्या विद्यार्थ्यांनाही त्याचा खूप मोठा फायदा होत होता; पण आता सगळ्याच विद्यार्थ्यांना या निर्णयाचा फटका बसणार आहे. 

सन २०२३ मध्ये अमेरिकन विद्यापीठांत जगभरातील जवळपास सव्वादहा लाख विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. त्यात भारतीय विद्यार्थ्यांची संख्या सुमारे ३,३२,००० इतकी होती.  २०२४मध्ये अमेरिकेत आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांची संख्या सुमारे १५,८०,००० इतकी होती.  त्यात भारतीय विद्यार्थ्यांचा वाटा तब्बल ४,२०,००० इतका होता. म्हणजेच दर चार विदेशी विद्यार्थ्यांमागे एक विद्यार्थी भारतीय होता. 

ट्रम्प यांनी आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी अमेरिकेची दारं ओढून घेतल्यानं यंदा ही संख्या बरीच घटली. यंदा केवळ दोन लाख ३१ हजार भारतीय विद्यार्थीच अमेरिकेत शिक्षणासाठी जाऊ शकले. याची तीन मुख्य कारणं म्हणजे ट्रम्प यांनी वटारलेले डोळे. त्यामुळे अमेरिकन विद्यापीठांनीही परदेशी विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी आखडता घेतलेला आपला हात आणि अमेरिकन दूतावासानं परदेशी विद्यार्थ्यांसाठी कडक केलेले व्हिसाचे नियम. 

अमेरिकेच्या अनेक विद्यापीठांनी तर यंदा परदेशी विद्यार्थ्यांना आधी दिलेल्या ॲडमिशन ऑफर्सही नंतर मागे घेतल्या. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर पाणी फेरलं गेलं. 

हीच बाब परदेशी फॅकल्टीबाबतही. यंदा अमेरिकेनं ‘डीइआय’ प्रोजेक्टअंतर्गत परदेशी प्राध्यापकांसाठी असलेला कोटाच बंद करून टाकला. या कोट्याअंतर्गत दरवर्षी भारतीय आणि परदेशी प्राध्यापकांना अमेरिकन विद्यापीठांत जॉब मिळत होता; पण आता हा कोटा बंद झाल्यामुळे अमेरिकन प्राध्यापकांचा विद्यापीठांतील प्रवेश मात्र अधिक सोपा झाला आहे. त्यामुळे तिथे श्वेतवर्णीय प्राध्यापकांची संख्या वाढली आहे. अर्थात हा बदल अमेरिकन जनता आणि विद्यार्थ्यांच्या मात्र पचनी पडलेला नाही.

टॅग्स :World Trendingजगातील घडामोडीDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाStudentविद्यार्थीuniversityविद्यापीठ