नवाज शरीफच बातम्या पसरवत असल्याचा लष्कराला संशय

By Admin | Updated: October 15, 2016 13:31 IST2016-10-15T10:02:53+5:302016-10-15T13:31:01+5:30

पाकिस्तानी लष्कराचे प्रमुख राहील शरीफ यांनी सरकार आणि लष्करात फूट पडल्याची बातमी बाहेर येण्याचे खापर नवाज शरीफ यांच्यावर फोडले आहे.

Army suspects Nawaz Sharif is spreading news | नवाज शरीफच बातम्या पसरवत असल्याचा लष्कराला संशय

नवाज शरीफच बातम्या पसरवत असल्याचा लष्कराला संशय

ऑनलाइन लोकमत

इस्लामाबाद, दि. 15 - भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर पाकिस्तानचे सरकार आणि तेथील लष्करामध्ये मतभेद निर्माण झाल्याची माहिती वारंवार समोर येत आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी सरकार आणि लष्करात सारे काही आलबेल असल्याचे कितीही सांगण्याचा प्रयत्न केला, तरी त्यांच्यातील वाद लपू शकत नाही, हीच बाब पुन्हा एकदा समोर आली आहे. 
 
पाकिस्तान लष्कराचे प्रमुख राहिल शरीफ यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी लष्करातील वरिष्ठ अधिका-यांसोबत बैठक पार पडली. यावेळी त्यांनी सरकार आणि लष्करात फूट पडल्याची बातमी बाहेर येण्याचे खापर नवाज शरीफ यांच्यावर फोडले आहे. शरीफ यांनी मतभेदाची बातमी फोडल्याचा संशय पाकिस्तान लष्कराने व्यक्त केला आहे. दहशतवाद्यांविरोधात ठोस कारवाई होत नसल्याने सरकार आणि लष्करात मतभेद निर्माण झाल्याची माहिती फुटण्यावर या बैठकीत गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली. तसेच या संदर्भातील बातमी छापणा-या डॉन वृत्तपत्राच्या पत्रकारवही देशाबाहेर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.
 
आणखी बातम्या
 
भारताने सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर पंतप्रधान नवाज शरीफ यांनी लष्करासोबत राष्ट्रीय सुरक्षेबाबत बैठक घेतली होती. मात्र, 
या बैठकीची बनावट तसेच कथित बातमी छापल्याची घटना राष्ट्रीय सुरक्षेचे उल्लंघन असल्याचे सांगत, राहिल शरीफ यांनी घेतलेल्या बैठकीत सहभागी झालेल्या अधिका-यांनी यावर गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली. तसेच 'डॉन' वृत्तपत्राला बैठकीतील गुप्त माहिती कळण्याबाबत पाकिस्तानी लष्कराने थेट नवाज सरकारलाच जबाबदार धरल्याचे दिसत आहे. यावरुनच, पाकिस्तानचे सरकार आणि लष्करात मतभेद असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे. 
 
दरम्यान, पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआयकडून हक्कानी व लष्कर-ए-तय्यबासारख्या दहशतवादी संघटनांना संरक्षण मिळत असून त्यामुळे पाकिस्तान आंतरराष्ट्रीय पातळीवर वेगळा पडत चालला आहे. आयएसआयच्या या भूमिकेमुळे पाकिस्तानचे सरकार आणि लष्कर यांच्यात मतभेद असल्याचे वृत्त ‘डॉन’ दैनिकात 6 ऑक्टोबर रोजी सायरिल अलमिडा यांनी बातमी दिली होती. त्यामुळे त्यांच्यावर देशातून बाहेर जाण्यास सरकारने मनाई केली आहे. 
 

 

Web Title: Army suspects Nawaz Sharif is spreading news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.