शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

ऑस्ट्रियामध्ये दहशतवादी हल्ला; 7 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

By सायली शिर्के | Updated: November 3, 2020 08:37 IST

Austria Terror Attack : दहशतवादी हल्ल्यामध्ये हल्लेखोरासह सात जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ऑस्ट्रियामध्ये दहशतवादी हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. या दहशतवादी हल्ल्यामध्ये हल्लेखोरासह सात जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोमवारी रात्री ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्नामध्ये हा हल्ला झाल्याची माहिती मिळत आहे. सहा वेगवेगळ्या ठिकाणांहून गोळीबार करण्यात आला आहे. डेली मेलने दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी हल्ल्यामध्ये 7 जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये एका हल्लेखोराचा देखील समावेश आहे. 

व्हिएन्ना पोलीस विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी हल्ल्यामध्ये अनेक जण जखमी झाले आहेत. तसेच जखमींमध्ये अधिकाऱ्यांचादेखील समावेश आहे. एका संशयिताला ठार करण्यात यश आलं असल्याची माहिती ट्विटरवरुन देण्यात आली आहे. संशयितांकडून रायफल्सच्या सहाय्याने हा हल्ला करण्यात आला. रात्री 8 वाजण्याच्या सुमारास गोळीबार होण्यास सुरुवात झाली. सहा वेगवेगळ्या ठिकाणांहून गोळीबार केला जात होता.

दहशतवादी हल्ल्यानंतर पोलिसांनी लोकांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. त्यापासून दूर राहा असंही म्हटलं आहे. ऑस्ट्रियाच्या गृहमंत्र्यांनी हा दहशतवादी हल्ला असण्याची शक्यता असून लोकांना घऱाबाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे. तसेच संशयित दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे. शोध घेण्यासाठी वेगवेगळ्या विशेष दलांना बोलावण्यात आल्याची माहिती दिली आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

अफगानिस्तानच्या काबुल विद्यापीठावर दहशतवाद्यांचा हल्ला, 10 जणांचा मृत्यू

अफगाणिस्तानमधील काबूल विद्यापीठावर याआधी दहशतवाद्यांनी हल्ला केला असून हल्ल्यात जवळपास दहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली होती. दहशतवाद्यांनी विद्यार्थ्यांना लक्ष्य करुन त्यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात 40 जण जखमी झाले. विद्यापीठ परिसरात घुसलेल्या दहशतवाद्यांनी विद्यार्थ्यांवर गोळीबार करण्यास सुरूवात केली. गोळीबाराचा आवाज ऐकून परिसरात खळबळ माजली होती. 

टॅग्स :Terror Attackदहशतवादी हल्लाDeathमृत्यूPoliceपोलिस