शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
2
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
3
ZIM vs SA Test: खतरनाक 'सुपर स्पिन'! गोलंदाजाच्या भन्नाट फिरकीने केली फलंदाजांची 'दांडी गुल' (Video)
4
जळगावच्या मुलीचे कोल्हापूरमध्ये लग्न! बापाने घेतला गळफास; आईला माहिती होती सगळी गोष्ट
5
'कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही', CM फडणवीसांचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन
6
अंबानी-अदानींना टाकले मागे! नागपूरच्या कंपनीने घडवला इतिहास! 'या' अब्जाधीशाची विक्रमी कमाई!
7
खळबळजनक! सोनमपासून प्रेरणा घेऊन बायकोने काढला नवऱ्याचा काटा, बाईकला GPS अन्...
8
जल्लोष करा पण कशाचा? राज ठाकरेंच्या एकेकाळच्या आमदाराने उबाठासोबत युतीवर मोठी भविष्यवाणी केली
9
विधानसभेला बंडखोरी केली, अपक्ष निवडणूक लढवली, काँग्रेसकडून बड्या नेत्याचं निलंबन अखेर मागे  
10
Accident Video: भयंकर... धडकी भरवणारा! हॉटेलच्या समोर कारने चौघांना चिरडले; अपघात सीसीटीव्हीत कैद
11
Mumbai: धक्कादायक! पतीला चोरीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवून पत्नीवर बलात्कार; पैसे, दागिनेही लुबाडले
12
१ जुलैपूर्वी तिकीट काढलं असेल तर प्रवाशांना द्यावे लागतील अतिरिक्त पैसे? अखेर रेल्वेने केलं स्पष्ट
13
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरुचरित्र सप्ताह करायचा आहे? पारायण कसे करावे? पाहा, नियम व पद्धती
14
धक्कादायक! रिक्षावाल्याला थांबवलं, पैसे घेऊन येतो म्हणाला अन्...; गोरेगावमध्ये तरुणाने संपवले स्वतःचे आयुष्य
15
इराण-इस्रायल युद्धबंदीनंतर सोन्याच्या किमतीत पहिल्यांदाच सर्वात मोठी वाढ! चांदीही चमकली!
16
'या' अभिनेत्याने घेतली निलेश साबळेंची जागा, 'चला हवा येऊ द्या'च्या नव्या पर्वाचं सूत्रसंचालन करणार
17
ENG vs IND : १२३ वर्षांत जे घडलं नाही ते करून दाखवण्याचं चॅलेंज; इथं पाहा टीम इंडियाचा रेकॉर्ड
18
वनप्लस पुन्हा एकदा डबल धमाका करणार; एकात वनप्लस १३ चा कॅमेरा? कोणते फोन येतायत...
19
हुंड्यासाठी पती झाला हैवान! दागिने, AC साठी टॉर्चर; लग्नानंतर ३ दिवसांनी नववधूने संपवलं जीवन
20
५०० वर्षांनी गुरु-शनिचा पॉवरफूल योग: ९ राशींचे कल्याण, अपार लाभ; भरघोस भरभराट, बक्कळ पैसा!

मोबाइल फोनमुळे ब्रेन कॅन्सर होतोय का? गेल्या तीन दशकांच्या संशोधनातील निष्कर्ष आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2024 13:19 IST

Health News: मोबाइल फोनमुळे मेंदूचा कर्करोग होत नाही, असे गेल्या तीन दशकांत झालेल्या संशोधनातून आढळले आहे. रेडिओलहरींचा माणसाच्या आरोग्यावर काय परिणाम होतो याबद्दल हा अभ्यास करण्यात आला होता.

मेलबर्न - मोबाइल फोनमुळे मेंदूचा कर्करोग होत नाही, असे गेल्या तीन दशकांत झालेल्या संशोधनातून आढळले आहे. रेडिओलहरींचा माणसाच्या आरोग्यावर काय परिणाम होतो याबद्दल हा अभ्यास करण्यात आला होता. जागतिक आरोग्य संघटनेने याकामी पुढाकार घेतला होता. या संशोधनाबाबतचा लेख जर्नल एन्व्हाॅयरमेन्टल इंटरनॅशनलच्या अंकात प्रसिद्ध झाला आहे. 

मोबाइल फोनमधील रेडिओलहरींमुळे मेंदूचा कर्करोग होण्याची शक्यता असते, असा एक समज आहे. तोच केंद्रस्थानी ठेवून हे संशोधन करण्यात आले होते. त्यातून असे लक्षात आले की, मोबाइलमधील रेडिओलहरींचा मेंदूचा कर्करोग होण्याशी काहीही संबंध नाही. मात्र काही शास्त्रज्ञांनी मेंदूचा कर्करोग होण्याच्या कारणांमध्ये मोबाइल फोनच्या रेडिओलहरींचाही समावेश केला होता. २०११ साली इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर या संस्थेने एका अभ्यासाअंती असाच निष्कर्ष काढला होता. (वृत्तसंस्था)

मत बदलले...२०११ नंतर हा समज आणखी वाढला होता.  त्यामुळे त्यावेळी त्यांच्या निष्कर्षांना कोणी विरोधही केला नव्हता. मात्र दीर्घकालीन अभ्यासानंतर बहुतांश शास्त्रज्ञांचे या विषयाबाबतचे मत बदलले आहे. 

‘मेंदूच्या कर्करोगाच्या रुग्णांत मोठी वाढ नाही’- मोबाइलच्या रेडिओलहरी व मेंदूचा कर्करोग या विषयावर आजवर अनेक वेळा अभ्यास करण्यात आला. 

१९९४ ते २०२२या कालावधीत ६३ अभ्यासांचे निष्कर्ष नियतकालिकांत प्रसिद्ध करण्यात आले होते. 

- गेल्या तीन दशकांतील संशोधनातून असे लक्षात आले की, वायरलेस तंत्रज्ञानाचा प्रसार जगभरात मोठ्या प्रमाणावर झाला असला तरी मेंदूचा कर्करोग झालेल्या रुग्णांच्या संख्येत खूप वाढ झालेली नाही.

टॅग्स :Mobileमोबाइलcancerकर्करोगHealthआरोग्य