अमेरिका-इस्रायल आणि इराणयुद्धामुळे मध्यपूर्वेतील तणार शिगेला पोहोचला आहे. यातच, इराणचे राष्ट्रपती मसूद पेजेश्कियान यांनी शेजारील अरब देशांवरील हल्ल्यांसंदर्भात खेद व्यक्त करत, हल्ले थांबवण्याची घोषणा केली. यावर आता अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिक्रिया देत, इराणची ही माघार केवळ अमेरिका आणि इस्रायलच्या दबावामुळेच शक्य झाल्याचे म्हटले आहे. आपल्या लष्करी शक्तीचे कौतुक करत ट्रम्प म्हणाले, एकेकाळी शेजाऱ्यांना धमकावणारा इराण आता एवढा कमकुवत झाला आहे की, तो आता माफी मागू लागला आहे.
काय म्हणाले ट्रम्प? - ट्रम्प शनिवारी सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमाने म्हणाले, "अमेरिकेकडून युद्धात मार खाल्यानंतर इराणने शरणागती पत्करली आहे. मध्यपूर्वेवर वर्चस्व गाजवण्याची स्वप्ने पाहणारा इराण हजारो वर्षांत पहिल्यांदाच आपल्या शेजाऱ्यांकडून पराभूत झाला आहे. इराण आता 'मिडल ईस्टचा बुली' राहिला नाही, तर 'लूझर' ठरला आहे." तसेच, अरब देशांनी याबद्दल आपले आभार मानले असल्याचेही ट्रम्प यांनी सांगितले.
ट्रम्प पुढे म्हणाले, "इराणकडे हल्ल्यापासून वाचण्याचा एकमेव मार्ग आहे, तो म्हणजे आत्मसमर्पण. इराणवर मोठ्या हल्ल्याचा इशारा देत ते म्हणाले, इराणच्या गैरवर्तनामुळे, ज्यांना यापूर्वी लक्ष्य करण्याचा विचार केला गेला नाही, आता त्यांनाही लक्ष्य करण्याचा गांभीर्याने विचार केला जात आहे.
काय म्हणाला होता इराण -दुसरीकडे, इराणचे राष्ट्रपती मसूद पेजेश्कियान, सरकारी दूरचित्रवाणीवरून संदेश देताना म्हणाले होते, "ज्या शेजारी देशांवर हल्ला करण्यात आला, त्यांची माफी मागणे महत्वाचे आहे, असे मला वाटते. शेजारी देशांवर हल्ला करण्याचा आमचा कोणताही हेतू नाही. आता जोपर्यंत आमच्यावर हल्ला होणार नाही, तोवर आम्हीही त्या देशांवर हल्ला करणार नाही."
अमेरिका आणि इस्रायलने २८ फेब्रुवारीपासून इराणवर मोठे हवाई हल्ले सुरू केले. याला प्रत्युत्तर म्हणून इराणने सौदी अरेबिया, कुवैत, कतार, यूएई आणि बहरीनमधील अमेरिकन लष्करी तळांना लक्ष्य केले होते. मात्र, वाढता तणाव पाहता शनिवारी इराणने या देशांवरील हल्ले थांबवत असल्याची अधिकृत घोषणा केली आहे.
Web Summary : Trump claims Iran's retreat from attacking neighbors is due to US/Israel pressure. He boasts of American military might, stating Iran now begs for mercy after facing defeat. Iran halted attacks following US/Israel airstrikes, promising no further aggression unless provoked.
Web Summary : ट्रंप का दावा है कि ईरान का पड़ोसी देशों पर हमला न करना अमेरिका/इजरायल के दबाव का नतीजा है। उन्होंने अमेरिकी सैन्य शक्ति की प्रशंसा करते हुए कहा कि हार के बाद ईरान अब दया की भीख मांग रहा है। अमेरिका/इजरायल के हवाई हमलों के बाद ईरान ने हमले रोक दिए, और उकसाने पर ही आगे बढ़ने का वादा किया।