सार्क देशांना गृहमंत्र्याचे आवाहन
By Admin | Updated: September 19, 2014 01:39 IST2014-09-19T01:39:05+5:302014-09-19T01:39:05+5:30
सार्क देशांसमोर उभ्या असलेल्या समान आव्हानांकरिता त्यांनी परस्परांना सहकार्य केले पाहिजे,

सार्क देशांना गृहमंत्र्याचे आवाहन
काठमांडू : सार्क देशांसमोर उभ्या असलेल्या समान आव्हानांकरिता त्यांनी परस्परांना सहकार्य केले पाहिजे, असे आवाहन करून भारत सार्कला एका मुख्य व्यासपीठाच्या रूपात पुनरुज्जीवित करण्यास कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी येथे केले.
सार्क देशांच्या गृहमंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी काठमांडू येथे आलेल्या सिंह यांनी सार्क देशांनी या क्षेत्रतील समान आव्हानांना तोंड देण्यासाठी परस्परांना सहकार्य केले पाहिजे, असे म्हटले. भारत प्राचीन काळापासूनच ‘वसुधैव कुटुंबकम’ या विचारसरणीवर विश्वास ठेवत असून शेजा:यांशी सौहार्दपूर्ण संबंध राखू इच्छितो, असेही ते म्हणाले. (वृत्तसंस्था)