anti india and modi stir in bangladesh backed by pakistan hefazat e islam | Bangladesh : भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात होत असलेल्या हिंसक आंदोलनामागे पाकिस्तानचा हात

Bangladesh : भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात होत असलेल्या हिंसक आंदोलनामागे पाकिस्तानचा हात

ठळक मुद्देकट्टरतावादी लोकांना फंड पुरवण्यात पाकिस्तान मदत करत असल्याची माहितीया हिसाचारात हत्जारी, चटगांव आणि ब्राह्मणबारियाला फटका बसला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बांगलादेश दौऱ्यानंतर त्या ठिकाणी होत असलेल्या हिंसक आंदोलनाच्या मागे आता पाकिस्तानी अँगल असल्याचं समोर येत आहे. इंडिया टुडेला वरिष्ठ पातळीवरून मिळालेल्या माहितीनुसार बांगलादेशमध्ये भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात होत असलेल्या हिंसक आंदोलनामागे पाकिस्तानचा हात आहे. पाकिस्तान कट्टरतावादी लोकांना फंड देण्यासोबतच त्यांची शक्य ती मदत करत आहे. 

बांगलादेशला ५० वर्षे पूर्ण झाल्याच्यानिमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी बांगलादेशच्या दोन दिवसीय दौऱ्यावर गेले होते. बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या या दौऱ्यानंतर अनेक ठिकाणी हिंसक आंदोलन होत असल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या हिंसक आंदोलनामागे पाकिस्तानचा हात आहे. जमात आणि बीएनपीची लोकं हे हिंसक आंदोलन करत आहेत आणि यामागे पाकिस्तानचा हात असल्याचंही समोर येत आहे असं सूत्रांनी सांगितलं. याबाबत बांगलादेशच्या संसदेनंही ट्वीट  केलं होतं. यात कट्टरतावादी संघटना हिफाजत-ए-इस्लाम आणि पाकिस्तान उच्चायोगामध्ये संबंध असल्याचं म्हटलं होतं. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बांगलादेश दौऱ्यानंतर बांगलादेशात हिफाजत-ए-इस्लाम अनेक ठिकाणी हिंसक आंदोलन करत आहे. "पाकिस्तानी उच्चायोग ढाका, हिफाजत-ए-इस्लामला फंड देत आहे, जेणेकरून भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आंदोलन केलं जाऊ शकेल. आम्ही धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही असलेलो देश आहोत. आम्ही या कृत्याचा निषेध करतो," असं बांगलादेशच्या संसदेनं म्हटलं आहे. परंतु नंतर हे ट्वीट डिलीट करण्यात आलं. यानंतर बांगलादेश संसदेनं आपल्या नव्या ट्वीटमध्ये म्हटलं की "पाकिस्तानचं कृत्य नींदनीय आगे. अनेक लोकांचं म्हणणं आहे की बांगलादेश जमात-ए-इस्लामीवर निर्बंध घातल्यानंतर आता हिफाजत-ए-इस्लाम या नावानं त्याचं संचालन केलं जात आहे. हा पक्षा देशात शरीया कायदा लागू करू इच्छित आहे."

पाकिस्तानचाच हात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बांगलादेश दौरा कव्हर करणाऱ्या टीमच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार मोदींच्या विराधात होत असलेल्या या आंदोलनाच्या मागे पाकिस्तानचा हात आहे. हिसाचार हा ब्राह्मणबारियाच्या पूर्वेकडील सीमावर्ती भागात झाला. याव्यतिरिक्त ढाक्यातील एका मशिदीतही हिंसाचार झाला. या हिसाचारात हत्जारी, चटगांव आणि ब्राह्मणबारियाला फटका बसला होता. या हिंसाचारावर स्वातंत्र्य सैनिकाचे सुपुत्र बॅरिस्टर शेख फजल नूर तपोश यांनीदेखील माहिली दिली. "बांगलादेशात इस्लामी कट्टरतावाद्यांद्वारे करण्यात आलेल्या हिंसाचाराला दहशतवादी संघटना जमात-ए-इस्लामीचं समर्थन मिळालं आहे. याचा यापूर्वी पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआयशी संबंध होता," असं ते म्हणाले. 

जमात-ए-इस्लामी पाकिस्तान समर्थक पक्ष

जमात-ए-इस्लामी हा पाकिस्तान समर्थक पक्ष आहे. हा पक्ष कायमच बांगलादेशच्या स्वातंत्र्याच्या विरोधात होता. सध्या त्यांच्यावर निवडणुका लढवण्यास बंदी घालण्यात आली आहे. परंतु जमात विरोधी पक्ष बांगलादेश नॅशनलिस्च पार्टीच्या प्रमुख सहकारी पक्षांपैकी एक आहे. "हिफाजतचं वर्तमान नेतृत्व भारत विरोधी आहे आणि विशेष करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधातील आहे. परंतु हिफाजतचा मोदी यांच्या दौऱ्याच्या विरोधातील कोणताही कार्यक्रम नव्हता. परंतु मोदी हे ढाक्यात आल्यानंतर काही लोकांनी बैतुल मुकर्रम मशिदीसमोर हिंसक आंदोलन सुरू केलं. हे वृत्त संपूर्ण देशात पसरलं आणि त्यानंतर हिफाजतही यात सामील झालं," असं ज्येष्ठ पत्रकार मसूल करीम यांनी सांगितलं.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: anti india and modi stir in bangladesh backed by pakistan hefazat e islam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.