अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 16:15 IST2025-12-18T16:15:08+5:302025-12-18T16:15:28+5:30
USA Attack Drug Vessel: अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेतील देश असलेल्या व्हेनेझुएलामधील तणाव सध्या विकोपाला केला आहे. त्यातच काही संशयास्पद जहाजांवर अमेरिकन सैन्याने हल्ले करण्यास सुरुवात केली असून, पूर्व पॅसिफिक महासागरामध्ये अमेरिकन सैन्याने एका जहाजावर केलेल्या हल्ल्यात ४ जणांचा मृत्यू झाला आहे.

अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय
अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेतील देश असलेल्या व्हेनेझुएलामधील तणाव सध्या विकोपाला केला आहे. त्यातच काही संशयास्पद जहाजांवर अमेरिकन सैन्याने हल्ले करण्यास सुरुवात केली असून, पूर्व पॅसिफिक महासागरामध्ये अमेरिकन सैन्याने एका जहाजावर केलेल्या हल्ल्यात ४ जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकन सैन्याने केलेल्या या हल्ल्यानंतर व्हेनेझुएलाने आपल्या बंदरांवरून पेट्रोलियम पदार्थ घेऊन जाणाऱ्या जहाजांना एस्कॉर्ट करण्याचे आदेश नौदलाला दिले आहेत. त्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव अधिकच वाढला आहे.
या हल्ल्याबाबत माहिती देताना अमेरिकन सैन्याने सांगितले की, पूर्व पॅसिफिक महासागरात ड्रग्सची तस्करी करणाऱ्या एका बोटीवर हल्ला केला. या हल्ल्यात ४ जणांचा मृत्यू झाला. १७ डिसेंबर रोजी पीट हेगसेथ यांच्या सूचनेनुसार संयुक्त पथक सदर्न स्पीयर्सने आंतरराष्ट्रीय सागरी हद्दीत एका कुख्यात दहशतवादी संघटनेकडून संचालित एका जहाजारवर हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये एकही अमेरिकन सैनिक जखमी झालेला नाही, असेही स्पष्ट करण्यात आले.
दरम्यान, बुधवारी करण्यात आलेला हल्ला हा अशा प्रकारचा दुसरा हल्ला आहे. याआधी सोमवारी अमेरिकेने पूर्व पॅसिफिक महासागरामध्ये ड्रग्स तस्करी करणाऱ्या तीन नौकांवर हल्ला केला होता. त्यात ८ जणांचा मृत्यू झाला होता.