मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वुर राणाला आणखी एक धक्का; अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने प्रत्यार्पण रोखण्याची याचिका फेटाळली
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 09:54 IST2025-03-07T09:53:53+5:302025-03-07T09:54:05+5:30
तहव्वुर राणा याची प्रत्यार्पण रोखण्याची याचिका अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे.

मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वुर राणाला आणखी एक धक्का; अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने प्रत्यार्पण रोखण्याची याचिका फेटाळली
मुंबईवरील दहशतवादी हल्ला प्रकरणातील मास्टरमाइंड तहव्वुर राणा याला पुन्हा एक धक्का बसला आहे. भारतात प्रत्यार्पणाविरोधातील याचिका अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे.
तहव्वुर राणा याने या याचिकेत पाकिस्तान वेशाचा असल्यामुळे तिथे छळले जाईल असा दावा केला होता. भारतात खटल्याला सामोरे जाण्यासाठी तो जिवंत राहण्याची शक्यता कमी आहे, याचिकेत राणाने असा युक्तिवाद केला. यासाठी राणाने त्याच्या गंभीर आजारांसह अनेक घटकांचा उल्लेख केला.
राणा याच्या याचिकेत असे नमूद केले होते की जर त्याच्या प्रत्यार्पणाला स्थगिती दिली नाही तर कोणताही आढावा घेणे शक्य होणार नाही.
राणाने याचिकेच्या गुणवत्तेनुसार त्याच्या प्रत्यार्पणाला स्थगिती देण्याची आणि भारतात आत्मसमर्पण रोखण्यासाठी मागणी केली होती.
या याचिकेमध्ये राणा याचे भारतात प्रत्यार्पण करणे हे अमेरिकेच्या कायद्याचे आणि छळाबाबत संयुक्त राष्ट्रांच्या कायद्याचेही उल्लंघन आहे, असं म्हटले होते.'जर याचिकाकर्त्याला भारतात प्रत्यार्पण केले तर त्याच्यावर अत्याचाराचा धोका आहे असे मानण्यासाठी पुरेसे कारण आहेत, असंही या याचिकेत म्हटले आहे.
६४ वर्षीय राणा हा पाकिस्तानी वंशाचा कॅनेडियन नागरिक आहे. त्याला सध्या लॉस एंजेलिसमधील एका तुरुंगवास केंद्रात ठेवण्यात आले आहे. २६/११ च्या हल्ल्यात राणावर त्याचा सहकारी डेव्हिड कोलमन हेडलीला मदत केल्याचा आरोप आहे. हेडलीला दाऊद गिलानी म्हणूनही ओळखले जाते.
त्याच्याकडे अमेरिकन नागरिकत्व होते. त्याची आई अमेरिकन होती आणि वडील पाकिस्तानी होते. हेडली हा मुंबई हल्ल्यातील मुख्य सूत्रधारांपैकी एक आहे. त्याला ऑक्टोबर २००९ मध्ये अमेरिकन अधिकाऱ्यांनी अटक केली होती.