अमेरिकेतील पाक दुतावासापुढे भारतीयांची निदर्शने, चप्पल चोरल्याच्या दिल्या घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 12:39 IST2018-01-09T00:03:27+5:302018-01-09T12:39:46+5:30

पाकिस्तानने फाशीची शिक्षा सुनावलेले कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबियांना इस्लामाबादेत नुकत्याच मिळालेल्या अमानवी वागणुकीचा भारतीय अमेरिकन्स, अफगाण आणि पाकमधील बलोच वंशाच्या गटाने पाकिस्तानच्या येथील दुतावासाबाहेर निदर्शने करून निषेध केला.

The announcement of the stalking of Indian demonstrations and slippers in front of the US counter Pakistan | अमेरिकेतील पाक दुतावासापुढे भारतीयांची निदर्शने, चप्पल चोरल्याच्या दिल्या घोषणा

अमेरिकेतील पाक दुतावासापुढे भारतीयांची निदर्शने, चप्पल चोरल्याच्या दिल्या घोषणा

वॉशिंग्टन : पाकिस्तानने फाशीची शिक्षा सुनावलेले कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबियांना इस्लामाबादेत नुकत्याच मिळालेल्या अमानवी वागणुकीचा भारतीय अमेरिकन्स, अफगाण आणि पाकमधील बलोच वंशाच्या गटाने पाकिस्तानच्या येथील दुतावासाबाहेर निदर्शने करून निषेध केला. कडाक्याच्या थंडीला तोंड देत निदर्शकांनी पाकिस्तानी दुतावासातील अधिकाºयांना देण्यासाठी स्वत:सोबत सँडल्सही आणल्या होत्या. (वृत्तसंस्था)

चप्पल-चोर पाक
कुलभूषण जाधव यांच्यावरील खटला लष्करी न्यायालयाने चालवून सगळ््या आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन केले गेले आहे, असे अमेरिकन फ्रेंडस आॅफ बलोचस्तानचे संस्थापक अहमार मुस्तिखान यांनी म्हटले. मुस्तिखान यांनी ही अभिनव निदर्शने ‘चप्पल-चोर पाकिस्तान’ या नावाने आयोजित केली होती.

Web Title: The announcement of the stalking of Indian demonstrations and slippers in front of the US counter Pakistan