श्रीलंकेत मध्यावधी निवडणुकीची घोषणा
By Admin | Updated: November 21, 2014 03:12 IST2014-11-21T03:12:11+5:302014-11-21T03:12:11+5:30
श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष महिंदा राजपाक्षे यांनी गुरुवारी नाट्यमयरीत्या मुदतपूर्व निवडणुकीची घोषणा केली.

श्रीलंकेत मध्यावधी निवडणुकीची घोषणा
कोलंबो : श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष महिंदा राजपाक्षे यांनी गुरुवारी नाट्यमयरीत्या मुदतपूर्व निवडणुकीची घोषणा केली. लोकप्रियतेत घट झाल्याची चिन्हे आणि आपल्या अधिकारात कपात करण्याची मागणी जोर धरू लागल्याच्या दृष्टिकोनातून लवकर निवडणूक घेऊन तिसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष बनण्याचा राजपाक्षेंचा मानस आहे.
राजपाक्षे २००५ आणि २०१० मध्ये निवडून आले होते. त्यांचा कार्यकाळ संपण्यास दोन वर्षांचा अवधी असताना त्यांनी मध्यावधी निवडणुकीची घोषणा केली.
राजपाक्षे सरकारी टीव्हीवर म्हणाले, आज मी एक गुपित उघड करत आहे. आपली सलग तिसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपदी निवड व्हावी यासाठी मी निवडणुकीच्या घोषणापत्रावर स्वाक्षरी केली आहे. हीच लोकशाही आहे. (वृत्तसंस्था)