अँजेलिना जोली-ब्रॅड पिट होणार विभक्त

By Admin | Updated: September 20, 2016 22:31 IST2016-09-20T21:41:30+5:302016-09-20T22:31:30+5:30

हॉलिवूडचे बहुचर्चित कपल अभिनेता ब्रॅड पिट व अभिनेत्री अँजलिना जोली विभक्त झाले आहेत. द असोशियस प्रेसच्या वृत्तानुसार १५ सप्टेबंरपासून दोघेही वेगळे राहत आहेत

Angelina Jolie-Brad Pitt to be divided | अँजेलिना जोली-ब्रॅड पिट होणार विभक्त

अँजेलिना जोली-ब्रॅड पिट होणार विभक्त

>ऑनलाइन लोकमत
पॅरिस, दि. २० हॉलिवूडचे बहुचर्चित कपल अभिनेता ब्रॅड पिट व अभिनेत्री अँजेलिना जोली विभक्त झाले आहेत. द असोसियट प्रेसच्या वृत्तानुसार १५ सप्टेबंरपासून दोघेही वेगळे राहत आहेत. अँजेलिनाने घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज दाखल केलेला आहे. 
 
गेल्या काही दिवसांपासूनच दोघांमध्ये वाद-विवाद सुरु असल्याच्या बातम्या येत होत्या. मात्र, दोघांपैकी कुणीही याबाबत अधिकृतरित्या काहीच सांगितलं नव्हतं. किंबहुना, अँजेलिनाने माध्यमांसमोर म्हटलं होतं की, काहीही झालं तरी, मी ब्रॅडसोबतच राहीन. हॉलिवूड एन्टरटेन्मेंट वेबसाईटच्या वृत्तानुसार, अँजेलिनाला सहाही मुलांना आपल्या सोबत ठेवायचं आहे. ब्रॅड ज्याप्रकारे मुलांना सांभाळतो, त्यावरुन अँजेलिना नाराज आहे.

अँजेलिना जोली-ब्रॅड पिट  ९ वर्षे एकत्र राहिल्यानंतर २९ ऑगस्ट २०१४ रोजी फ्रान्समध्ये विवाहबद्ध झाले होते. मि. अँड मिसेस.स्मिथ चित्रपटादरम्यान या दोघांची ओळख झाली व त्याचे प्रेमात रुपांतर झाले होते. ब्रॅड पिटचे हे दुसरे लग्न होते यापूर्वी त्याने २००० साली अभिनेत्री जेनिफर अ‍ॅनिस्टशनी लग्न केले होते, मात्र २००५ साली ते विभक्त झाले. तर अँजलिना जोलीचे हे तिसरे लग्न होते. 
 

Web Title: Angelina Jolie-Brad Pitt to be divided