शनीच्या चंद्रावर लपलाय महासागर; संशोधकांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2024 10:37 AM2024-02-09T10:37:17+5:302024-02-09T10:38:47+5:30

कवचाखाली ३० किलोमीटरवर खोल असित्त्व

An ocean hidden on Saturn's moon; Researchers claim | शनीच्या चंद्रावर लपलाय महासागर; संशोधकांचा दावा

शनीच्या चंद्रावर लपलाय महासागर; संशोधकांचा दावा

केप कार्निव्हल : खगोलशास्त्रज्ञांना शनीच्या ‘डेथ स्टार’सारख्या लहान चंद्राच्या बर्फाळ पृष्ठभागाखाली विस्तीर्ण, तरुण महासागराचा मोठा पुरावा सापडला आहे. फ्रेंच नेतृत्वाखालील पथकाने शनीचा चंद्र मिमासच्या कक्षा आणि परिभ्रमणातील बदलांचे विश्लेषण केले आणि अहवाल दिला की गोठलेल्या कवचाखाली २० ते ३० किलोमीटर लपलेला समुद्र लपला असण्याची शक्यता आहे. शास्त्रज्ञांनी त्यांचे निष्कर्ष नासाच्या कॅसिनी अंतराळयानाने केलेल्या निरीक्षणांवर आधारित आहेत. 

पृथ्वीवरील महासागरांच्या तुलनेत छोटे
nलेनी यांच्या म्हणण्यानुसार, मिमासचा भूगर्भातील अर्धा भाग समुद्र असेल असे मानले जाते. तरीही चंद्राचा आकार पाहता पृथ्वीच्या महासागरांपैकी तो केवळ १.२ ते १.४ टक्के असण्याची शक्यता आहे.
nइतका लहान असूनही मिमास सौरमालेतील कोणत्याही चंद्रापेक्षा दुसरा सर्वात मोठे विवर असलेला चंद्र आहे. संशोधन ‘नेचर’ नियताकिकात प्रकाशित झाले आले.

समुद्री जीवसृष्टीची शक्यता
पॅरिस वेधशाळेचे संशोधक आणि संशोधन प्रबंधाचे सह-लेखक व्हॅलेरी लेनी यांनी एका ईमेलमध्ये म्हटले आहे की, “मीमास हे जागतिक महासागर शोधण्यासाठी सर्वात कमी शक्यता असलेले ठिकाण होते. परंतु आता तेथे शक्यता निर्माण झाली आहे. तेथे समुद्री जीवसृष्टी अस्तित्वात असेल किंवा त्याची सुरुवात झाली असेल.”

यापूर्वीही काय झाले होते संशोधन?
शास्त्रज्ञांनी २०१७ मध्येही शनीच्या याच ‘डेथ स्टार’ चंद्राच्या पृष्ठभागाखाली तरुण महासागर शोधल्याचा दावा केला होता.
‘नासा’च्या कॅसिनी मोहिमेच्या शेवटच्या दिवसांमध्ये, अंतराळ यानाने चंद्राच्या परिभ्रमणामध्ये एक विचित्र कंपन किंवा दोलन ओळखले जे सहसा भूगर्भीयदृष्ट्या सक्रिय भूभागाकडे निर्देश करते. 
त्यामुळे तेथील भूगर्भात महासागर असण्याची शक्यता बळावली होती.

Web Title: An ocean hidden on Saturn's moon; Researchers claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.