शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

चीनसोबत युद्धासाठी अमेरिका तयार करतोय 'किलर मिसाइल्स'चा साठा, 'अशी' आहे सैन्याची रणनीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2020 21:42 IST

अमेरिका केवळ युद्धाची रणनीतीच तयार करत नाही, तर मोठ्या प्रमाणावर शस्त्र साठाही तयार करत आहे. याचाच एक भाग म्हणून अमेरिका खाडी युद्ध ते अफगाणिस्तानविरोधातील मोहिमेत यशस्वी ठरलेल्या क्रूझ मिसाइलची क्षमताही वाढवत आहे.

ठळक मुद्देक्रूझ मिसाइलची क्षमताही वाढवत आहे अमेरिकाप्रशांत महासागर हे अमेरिका आणि चीन यांच्या तणावाचे केंद्र बनले आहेटॉमहॉक क्रूझ मिसाइल सर्वप्रथम 1991च्या  खाडी युद्धाच्यावेळी प्रसिद्ध झाले होते

वॉशिंग्टन : कोरोना व्हायरस, साउथ चायना सी, जपान आणि तौवानच्या मुद्द्यावरून चीन आणि अमेरिकेदरम्यान तणावाचे वातावरण आहे. यातच आता अमेरिकेने पीएलएसह युद्धाची तयारी सुरू केली आहे. अमेरिका केवळ युद्धाची रणनीतीच तयार करत नाही, तर मोठ्या प्रमाणावर शस्त्र साठाही तयार करत आहे. याचाच एक भाग म्हणून अमेरिका खाडी युद्ध ते अफगाणिस्तानविरोधातील मोहिमेत यशस्वी ठरलेल्या क्रूझ मिसाइलची क्षमताही वाढवत आहे.

दक्षिण चीन समुद्र आहे तणावाचे केंद्र -रॉयटर्स या वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत महासागर हे अमेरिका आणि चीन यांच्या तणावाचे केंद्र बनले आहे. चीन वेगाने आपला शस्त्रसाठा वाढवत आहे. तर जगतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेनेही बिजिंगबरोबर कुठल्याही युद्धासाठी कंबर कसली आहे. अमेरिका आपल्या यशस्वी मिसाईल्सपैकी एक असलेल्या टॉमहॉक क्रूझ मिसाइलची नवी अवृत्ती तयार करत आहे.

आणखी वाचा - योगी सरकारचा तब्बल 16 लाख कर्मचाऱ्यांना झटका, सहा प्रकारचे भत्ते कायमचे बंद

टॉमहॉक क्रूझ मिसाइलने सज्ज होतील मरीन -अ‍मेरिका आपल्या मरीन सैन्यालाही टॉमहॉक मिसाइलने सज्ज करणार आहे. आता आशियन प्रशांत भागात लांब पल्ल्याचे आणि जमिनीवरून मारा करता येतील, असे मिसाइल्स तैनात करण्याची योजना अमेरिकेने आखली आहे. अमेरिकेने अनेक दशकांनंतर लांब पल्ल्याचे अँटी शीप मिसाइल तयार करायला सुरुवात केली आहे. यावर, अमेरिकेने धमक्या देणे बंद करावे, असे चीनने म्हटले आहे.

आणखी वाचा - CoronaVirus News : संशोधकांचा दावा; आणखी 2 वर्षे हाहाकार माजवणार कोरोना, 'या'मुळे होऊ शकणार नही खात्मा

अशी आहे चीनविरोधात अमेरिकेची रणनीती -अमेरिकन सैन्‍याच्या कमांडर्सनी गेल्या काही दिवसांपूर्वी कांग्रेसला सांगितले, की टॉमहॉक क्रूझ मिसाइल्सने सज्ज असलेले मरीन सैनिक पश्चिमी प्रशांत महासागरावर नियंत्रण ठेवण्यासाठी अमेरिकन नौदलाची मदत करतील. मरीन कोरचे कमांडंट जनरल डेव्हिड बर्गर म्हणाले, 'टॉमहॉक क्रूझ मिसाइल आम्हाला, या कामासाठी अत्यंत उपयोगी ठरेल.' टॉमहॉक क्रूझ मिसाइल सर्वप्रथम 1991च्या  खाडी युद्धाच्यावेळी प्रसिद्ध झाले होते. यूएस मरीनसाठी नवे मिसाइल 2022पर्यंत तयार होतील. 

अमेरिका एका लांब पल्ल्याच्या मिसाइल्सचे परीक्षण करत आहे, जे चिनी युद्धनौकांना निशाणा बनवू शकते. यामुळेच चीन अस्वस्थ झाला आहे.

आणखी वाचा - CoronaVirus News: धक्कादायक!; 6 दिवसांपूर्वी थाटात केलं लग्न, आता नवरदेवच निघाला कोरोना पॉझिटिव्ह, संपूर्ण गावात कर्फ्यू

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिकाchinaचीनwarयुद्धsouth china seaदक्षिण चिनी समुद्रDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पUSअमेरिका