शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

Border Dispute : लडाख सीमेवर तणाव, त‍िबेटमध्ये अंधारात सुरू आहे चीनचा युद्ध सराव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2020 10:04 IST

चीनमधील वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने या युद्धाभ्यासाची माहिती दिली आहे. यात म्हणण्यात आले आहे, की भारत आणि चीनची सीमा उंचावर आहे. दोन्ही देशांच्या सैन्यात काही घटनादेखील झाल्या आहेत.

ठळक मुद्देचीनने सोमवारी रात्री उशिरा 4,700 मीटर उंचीवर आपले सैनिक पाठवून कठीन परिस्थित ताकदीचा आणि क्षमतेचा अंदाज घेतला.चीनमधील वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने या युद्धाभ्यासाची माहिती दिली आहे.भारताला लागून असलेल्या सीमेवर चीनची भूमिका आक्रमक असल्याने अमेरिकेनेही चिंता व्यक्त केली आहे.

पेइचिंग : लडाखमधील भारत-चीन सीमेवर गेल्या काही दिवसांपासून दोन्ही देशांचे सैनिक तैनात आहेत. एकिकडे अमेरिकेने चीनला डिप्लोमसीचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. तर दुसरीकडे चीन अर्ध्यारात्री अंधारात युद्ध सराव करत आहे. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या तिबेट मिलिट्री कमांडने सोमवारी रात्री उशिरा 4,700 मीटर उंचीवर आपले सैनिक पाठवून कठीन परिस्थित ताकदीचा आणि क्षमतेचा अंदाज घेतला.

पुन्हा भारताच्या समर्थनात उभा ठाकला अमेरिका, चीनला दिला सज्जड इशारा

पुढची तयारी करतोय चीन -चीनमधील वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने या युद्धाभ्यासाची माहिती दिली आहे. यात म्हणण्यात आले आहे, की भारत आणि चीनची सीमा उंचावर आहे. दोन्ही देशांच्या सैन्यात काही घटनादेखील झाल्या आहेत. यामुळे दोन्ही देशांत तणाव वाढला आहे. यावरून अंदाज लावण्यात येत आहे, की चीन या तणावाच्या पार्श्वभूमीवर एक पाऊल पुढची तयारी करत आहे. भारताला लागून असलेल्या सीमेवर चीनची भूमिका आक्रमक असल्याने अमेरिकेनेही चिंता व्यक्त केली आहे.

"चीनला 'बॅन' करा, उद्योग-धंदे भारतात हलवा"; अमेरिका तयार करत आहे 'मास्टर प्लॅन'

अंधारात शक्तीप्रदर्शन -चीन सेन्ट्रल टेलिव्हीजनने (CCTV) दिलेल्या माहितीनुसार  सोमवारी रात्री 1 वाजता पीएलएच्या स्काउट युनिटने तांगुला पहाडांच्या दिशेने येण्यास सुरूवात केली आहे. मार्च महिन्यादरम्यान ड्रोनपासून बचाव व्हावा यासाठी, गाडीचे लाईट्स बंद ठेवण्यात आले आणि नाईट व्हिजन डिव्हाईसची मदत घेण्यात आली. एवढेच नाही, तर मार्गात येणारे अडथळे पार करून ड्रोनच्या सहाय्याने स्फोट केले गेले. लक्ष्याच्या जवळ जाऊन कॉम्बॅट टेस्टदेखील करण्यात आली. यासाठी, स्नायपर युनिटला समोर पाठवण्यात आले. यासोबतच फायर स्ट्राइक टीमने एकगाडीही अँटी टँक रॉकेटने उडवली. यावेळी नव्या उपकरणांसह लढण्यास सैन्य कितपत तयार आहे, याचाही अंदाज घेण्यात आला.

'हे' आहेत जगातील 10 सर्वात मोठे चक्रीवादळं; तांडव आठवले, की आजही उडतो लोकांचा थरकाप

CoronaVirus News: मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या 'या' औषधांसंदर्भात WHOने दिला गंभीर इशारा; होतील अधिक मृत्यू!

रात्रीच्या हल्ल्याने वाढूशकते अडचण -साउथवेस्ट चीनचे तिब्बत ऑटोनॉमस रिजनच्या उंचावरील भागात तैनात राहिलेल्या रिटायर्ड पीएलए अधिकाऱ्याने ग्लोबल टाइम्सला सांगितले, की या भागात रात्रीच्यावेळी अत्यंत ठंडी असते. तसेच उंचावर ऑक्सिजनदेखील कमी होतो. यामुळे सैन्याला त्रास होऊ शकतो. एवढेच नाही, तर हार्डवेअर्सच्या वापरातही अडचणी येऊ शकतात. ते म्हणाले, रात्री हल्ला करून केवळ एक लढाईच जिंकली जाऊ शकते आणि यात अचानक हल्ला केल्यास मदत मिळू शकते.

कोरोनाने अमेरिकेत घेतले 1 लाखहून अधिक बळी, नेमकी कुठे झाली 'सुपरपावर'ची चूक

 

 

 

टॅग्स :border disputeसीमा वादBorderसीमारेषाchinaचीनIndiaभारतAmericaअमेरिकाNarendra Modiनरेंद्र मोदीladakhलडाख