शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
2
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
3
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
4
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
5
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
6
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
7
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
8
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
9
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
10
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
12
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
13
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
14
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
15
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
16
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
17
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
18
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
19
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
20
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न

भारत-चीन सीमावाद सुरू असतानाच PM मोदींना पुतिन यांचा फोन, अमेरिकेनं दिली अशी रिअ‍ॅक्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2022 10:55 IST

महत्वाचे म्हणजे, ज्यावेळी पुतिन यांनी पंतप्रधान मोदींना कॉल केला होता. तेव्हा युक्रेनमध्ये बॉम्बिंग सुरू होती.

भारत-चीन संबंध पुन्हा एकदा ताणले गेले असतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांच्यात फोनवरून चर्चा झाली आहे. यावरून आता अमेरिकेचीही (US) प्रतिक्रिया समोर आली आहे. अमेरिकेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तारीफ करत, युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या स्थितीचे स्वागत करतो आणि हिंसाचार थांबवावा व कूटनीतीच्या मार्गावर चालण्याचे आवाहन करतो, असे म्हटले आहे. याच बरोबर, आम्ही पंतप्रधान मोदींना त्यांच्या शब्दात घेऊ आणि ते जेव्हा असतील तेव्हा आम्ही त्यांच्या वक्तव्यांचे स्वागत करू. रशियासोबत राहण्यासंदर्भात इतर देश त्यांचा निर्णय घेतील. आम्ही युद्धाचा प्रभाव कमी करण्यासंदर्भात सहकाऱ्यांसंदर्भात समन्वय ठेवू,असे अमेरिकेकडून म्हणण्यात आले आहे.

पुतिन आणि पंतप्रधान मोदी यांच्यात चर्चा -महत्वाचे म्हणजे, ज्यावेळी पुतिन यांनी पंतप्रधान मोदींना कॉल केला होता. तेव्हा युक्रेनमध्ये बॉम्बिंग सुरू होती. रशियाने बऱ्याच दिवसांच्या ब्रेकनंतर युक्रेनवर एवढा जबरदस्त हल्ला चढवला आहे. राजधानी कीवमध्ये सायरन वाजत आहेत. अनेक भागांत अंधार पसरला आहे. यातच, रशिया यावर्षाच्या अखेरीस अथवा पुढील वर्षाच्यासुरुवातीला 2 लाखहून अधिक सैनिकांसह युक्रेनवर पुन्हा एकदा हल्ला करू शकतो, असे युक्रेनकडून बोलले जात  आहे.

युक्रेन वाद संपवण्याचा सल्ला - यातच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वी समरकंदमध्येही पुतिन यांना चर्चेतून आणि कूटनीतीच्या माध्यमाने युक्रेन वाद संपवावा, असा सल्ला दिलेला होता. या दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या फोनवरील चर्चेचा मुद्दाही आता समोर आला आहे. भारत आणि रशिया दरम्यान होणारे वार्षीक शिखर सन्मेलन होणार नाही, अशी चर्चा सुरू असतानाच, अनेक मुद्यांवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. यात, युक्रेन वॉरपासून ते भारत-रशिया संरक्षण करार आणि जी-20 मध्ये पुतिन यांच्या भागीदारीवरही चर्चा झाली. 

भारत-रशिया वार्षिक समिटचा अजेंडा - फोन कॉलमध्ये भारत-रशिया वार्षिकी समिटचा अजेंडाही दिसला. भारत आणि रशिया यांच्यात या वर्षी वार्षिक समीट होणार नाही. गेल्या 2000 पासून दोन्ही देशांत ही बैठक होत आली आहे. या दोन्ही नेत्यांनी समरकंद SCO समिटनंतर, पहिल्यांदाच द्विपक्षीय संबंधांसंदर्भात, एनर्जी, ट्रेड आणि इंव्हेस्टमेन्ट, डिफेन्स आणि सिक्योरिटी सहकार्य आदींसह इतरही काही विषयांवर चर्चा  केली.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीVladimir Putinव्लादिमीर पुतिनAmericaअमेरिकाchinaचीन