भारताला अमेरिकेची F-35 लढाऊ विमानांची ऑफर; पाकिस्तानच नाही तर तुर्कीलाही मिर्च्या झोंबल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 12:31 IST2025-02-18T12:30:45+5:302025-02-18T12:31:35+5:30
भारताकडे अमेरिकेची एफ ३५ आणि रशियाच्या फायटर जेटचा तगडा पर्याय आहे. रशियाचे लढाऊ विमान अमेरिकेपेक्षा जास्त क्षमतेचे आहे.

भारताला अमेरिकेची F-35 लढाऊ विमानांची ऑफर; पाकिस्तानच नाही तर तुर्कीलाही मिर्च्या झोंबल्या
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यावेळी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एफ-३५ या अद्ययावत लढाऊ विमानांच्या खरेदीची ऑफर दिली आहे. यावरून पाकिस्तानच नाही तर तुर्कस्तानला देखील मिर्च्या झोंबल्या आहेत. ही लढाऊ विमाने वादग्रस्त असली तरीही या देशांना भारताला रेडकार्पेट देणे पचलेले नाही.
भारताकडे अमेरिकेची एफ ३५ आणि रशियाच्या फायटर जेटचा तगडा पर्याय आहे. रशियाचे लढाऊ विमान अमेरिकेपेक्षा जास्त क्षमतेचे आहे. आता पुढे काय निर्णय होतात त्यावर सारे अवलंबून असले तरी भारताला एक न्याय आणि आम्हाला एक न्याय असा आरोप तुर्कीने केला आहे. झालेय असे की, भारताकडे रशियाची एस ४०० ही डिफेंस सिस्टिम आहे, तुर्कीकडेही आहे. तुर्कीने अमेरिकेची ही लढाऊ विमाने खरेदी करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा अमेरिकेने तुम्ही रशियाची सिस्टिम खरेदी केली, यामुळे तुम्हाला आमची विमाने मिळणार नाहीत असे सांगत धुडकावून लावले होते.
यामुळे अमेरिका दुटप्पी वागत असल्याचा आरोप तुर्कीच्या संरक्षण तज्ञांनी केला आहे. अमेरिकेने आम्हाला F-35 प्रोग्राममधून बाहेरचा रस्ताच नाही दाखविला तर CAATSA प्रतिबंध देखील लादले गेले. अमेरिका भारतासोबत वेगळे वागत आहे, असा आरोप या तज्ञांचा असल्याचे इंडियन डिफेंस रिसर्च विंगच्या बातमीत म्हटले आहे.
तुर्की नाटोचा सदस्य आहे. २०१७ मध्ये त्यांनी रशियाकडून संरक्षण प्रणाली घेतली होती. यावेळी रशियाचे एस ४०० चे रडार एफ ३५ चे तंत्रज्ञान चोरू शकतात असा दावा करण्यात आला होता. भारताने त्यानंतर एक वर्षाने रशियाकडून एस ४०० सिस्टिम घेतली होती. तेव्हा अमेरिकेने नाराजी व्यक्त केली होती, परंतू आता भारताला त्यांचे तुर्कीला न दिलेले विमान देत आहे, यामुळे तुर्कीचे तज्ञ नाराज आहेत.