शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेचे क्रूर कृत्य, इस्रायल-ट्रम्पचा विनाश अटळ : संतप्त इराणचा इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 05:33 IST

सहाव्या दिवशी आखात पेटलेले, जोरदार हल्ले सुरूच इराणमधील एक धर्मगुरू अयातुल्ला अब्दुल्ला जवादी अमोली यांनी सरकारी दूरचित्रवाणीवरून इस्रायल व ट्रम्पचा विनाश करावा असे थेट आवाहन देशवासियांना केले. 

दुबई : इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल युद्धाच्या सहाव्या दिवशी इराणवर मोठ्या प्रमाणात हवाई हल्ले करण्यात आले. तर त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने इस्रायल आणि अमेरिकेच्या १४ हून अधिक आखाती व अन्य देशातील लष्करी तळांवर क्षेपणास्त्राने हल्ले केले. 

या दरम्यान बुधवारी श्रीलंकेजवळ अमेरिकेने इराणी युद्धनौकेवर टॉर्पोडोने हल्ला करून ती उद्ध्वस्त केली होती, या हल्ल्याचा अमेरिकेला पश्चाताप करावा लागेल, अशी धमकी इराणने दिली आहे. इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी 'आयआरआयएस देना' ही युद्धनौका बुडवणे हे अमेरिकेच्या नौदलाचे क्रूर कृत्य असल्याचा आरोप केला आहे. अमेरिकेने जो पायंडा पाडला आहे, त्याबद्दल त्यांना पश्चात्ताप व्यक्त करावा लागेल, अशी धमकीही त्यांनी दिली. तर इराणमधील एक धर्मगुरू अयातुल्ला अब्दुल्ला जवादी अमोली यांनी सरकारी दूरचित्रवाणीवरून इस्रायल व ट्रम्पचा विनाश करावा असे थेट आवाहन देशवासियांना केले. 

या युद्धात इराणमधील मृतांचा आकडा १,२३० तर लेबनॉनमधील आकडा ७० हून अधिक झाला आहे. तर इस्रायलमधील मृतांचा आकडा एक डझनहून अधिक झाला आहे. अमेरिकेचे ६ सैनिक ठार झाले आहेत.

इस्रायलचे हिजबुल्लाहवर हल्लेइस्रायलने लेबनॉनमधील इराण समर्थित हिजबुल्लाच्या ८० तळांवर तीव्र हल्ले केले. इस्रायलने बैरूतच्या दक्षिण उपनगरातील रहिवाशांना स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तातडीने घर खाली करा अशा सूचनाही दिल्या. 

कुर्दीश मुख्यालय उद्ध्वस्तइराणने उत्तर इराकमधील इराणी कुर्दिश दलाच्या लष्करी मुख्यालय तीन क्षेपणास्त्रे डागून उद्ध्वस्त केले. त्यात एकजण ठार झाला. कुर्दीश बंडखोर इराणविरोधात युद्धात उतरल्याने इराणने कुर्दीस्तान आता लक्ष्य केले.

अखेर अली खामेनेईंच्या निधनावर भारताचा शोकनवी दिल्ली : अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यात ठार झालेले इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या निधनाबद्दल भारताने गुरुवारी अधिकृतपणे शोक संवेदना प्रकट केल्या. भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी इराणच्या दूतावासाला भेट देऊन तेथील शोकपुस्तिकेवर स्वाक्षरी केली. यावेळी इराणचे भारतातील राजदूत मोहम्मद फथाली हे उपस्थित होते. फथाली व मिस्री यांच्यातील चर्चेचे  छायाचित्र नंतर प्रसिद्ध करण्यात आले.

भारत सरकारची सावध भूमिकापश्चिम आशियातील युद्धपरिस्थिती संवाद आणि मुत्सद्देगिरीने सोडवावी, असे आवाहन भारताने सातत्याने केले असले, तरी खामेनेई यांच्या हत्येवर थेट प्रतिक्रिया देणे भारताने टाळले होते. 

मोदी-मॅक्रॉन यांच्यात चर्चा गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी फोनवर चर्चा केली. यावेळी दोन्ही नेत्यांनी आखात युद्धावर संवाद व मुत्सद्देगिरीचा मार्ग स्वीकारण्यावर भर दिला. 

English
हिंदी सारांश
Web Title : Iran Warns America: Israel-Trump's Destruction Inevitable After Cruel Act

Web Summary : Iran threatens retaliation after America allegedly destroyed its warship near Sri Lanka. Iran targeted Israeli and US bases. India expressed condolences over Khamenei's death, advocating diplomacy amid rising tensions.
टॅग्स :IranइराणWarयुद्ध