अमेरिकेचा मोठा निर्णय! कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षाचा व्हिसा रद्द करणार, कारण काय सांगितलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 12:04 IST2025-09-27T12:02:08+5:302025-09-27T12:04:55+5:30
Colombia President News: कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष गुस्तावो पेट्रो यांचा व्हिसा अमेरिका रद्द करणार आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने याबद्दलची माहिती दिली.

अमेरिकेचा मोठा निर्णय! कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षाचा व्हिसा रद्द करणार, कारण काय सांगितलं?
America Colombia President News: कोलंबियाचेराष्ट्राध्यक्ष गुस्तावो पेट्रो यांचा व्हिसा रद्द करण्याचा निर्णय अमेरिकेने घेतला आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने याबद्दलची शुक्रवारी माहिती दिली. आम्ही कोलंबियाच्याराष्ट्राध्यक्षांचा व्हिसा रद्द करणार आहोत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
डाव्या विचारसरणीचे नेते आणि कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष गुस्तावो पेट्रो यांनी न्यूयॉर्कमध्ये पॅलेस्टाईन समर्थक आंदोलनात सहभागी होत. त्यांना संबोधित केले होते. पेट्रो न्यूयॉर्कमधून शुक्रवारी रात्रीच कोलंबियासाठी रवाना झाले.
अमेरिकेने पेट्रो यांच्याबद्दल काय म्हटलं आहे?
गुस्तावो पेट्रो यांनी चिथावणी देणारी कृती केल्याचे कारण देत अमेरिकेने त्यांचा व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने सोशल मीडियावरून याबद्दलची माहिती दिली.
पेट्रो यांनी ट्रम्प यांना म्हटले हुकुमशाह
पेट्रो संयुक्त राष्ट्र महासंघाच्या सभेसाठी आले होते. त्यावेळी संयुक्त राष्ट्रे मुख्यालयाबाहेर त्यांनी जमलेल्या आंदोलकांना संबोधित केले होते. "मी अमेरिकेच्या सैन्यातील सर्व जवानांना विनंती करतो की, त्यांनी लोकांवर बंदूक रोखू नये. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आदेश मानू नका. माणुसकीचे आदेश पाळा", असे विधान पेट्रो यांनी केले होते.
एका मुलाखतीत पेट्रो यांनी ट्रम्प आणि अमेरिकेवर टीका केली होती. अमेरिकेने कॅरेबियन समुद्रात जहाजांवर हवाई केले. त्या हल्ल्यांबद्दल बोलताना पेट्रो म्हणालेले की, ही हुकुमशाहाने केलेली कारवाई आहे.
पेट्रो यांच्याकडून सातत्याने अध्यक्ष ट्रम्प यांच्यावर टीका केली जात असून, त्यांनी पॅलेस्टाईन समर्थकांना संबोधित केल्यानंतर अमेरिकेने त्यांचा व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेतला.