इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल यांच्यातील हल्ले सुरूच आहे. २८ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू झालेल्या या युद्धाची तीव्रता अजूनही कमी झालेली नाही. त्यातच होर्मुझ स्ट्रेट सामुद्रधुनी तेल, गॅस वाहतुकीसाठी धोक्याची बनली आहे. अमेरिकेने याच सामुद्रधुनीत इराणची १६ जहाज उडवली आहेत.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी असा दावा केला आहे की, अमेरिकेच्या लष्कराने आतापर्यंत सुरूंग लावणारी इराणची जहाज उद्ध्वस्त केली आहेत. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनुसार, मोहीम हाती घेण्यात आली होती, त्यात १६ जहाज उडवण्यात आली.
इराणचे जहाज उडवतानाचा व्हिडीओ
ट्रम्प यांनी असेही म्हटले आहे की, होर्मुझ स्ट्रेट सुरक्षित राहील. तिथे आमचे असंख्य युद्धनौका तैनात आहेत. आमच्याकडे जगातील सर्वात चांगली उपकरणे आहेत, जी समुद्रात लावण्यात आलेल्या स्फोटकांना शोधू शकते.
इराणकडे सुरुंग लावणारी ८० ते ९० टक्के जहाज शिल्लक सीएनएनने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या रिपोर्टनुसार, इराणने मागील काही दिवसांत समुद्रामध्ये बऱ्याच प्रमाणात स्फोटके पेरली आहेत. इराणजवळ अजूनही ८० ते ९० छोट्या बोटी आणि स्फोटके पेरणाऱ्या जहाज अजून शिल्लक आहेत. त्यामुळेच इराण होर्मुझ स्ट्रेट सामुद्रधुनीत असंख्य सुरूंग पेरू शकतो.
आतापर्यंत मोठ्या प्रमाणात सुरुंग लावण्यात आलेले नाहीत. मात्र, काही डझन स्फोटके लावण्यात आलेली आहेत. इस्लामिका रिव्हॉल्युशनरी गार्ड कॉर्प्सजवळ सुरूंग लावणाऱ्या बोटी, स्फोटके भरलेल्या आणि वेगवान युद्धनौका, तसेच किनाऱ्यावर तैनात असलेल्या मिसाईल्स बॅटरींच्या मदतीने सुरूंग पेरण्याची क्षमता आहे, असे सूत्रांनी सांगितले.
यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले होते की, जर इराणने होर्मुझ स्ट्रेट सामुद्रधुनीमध्ये स्फोटके लावलेली असतील, तर त्यांनी तातडीने ती हटवावी. कोणत्याही कारणामुळे सुरूंग पेरले गेले असतील आणि ते लवकर काढण्यात आले नाहीत, तर इराणला अशा लष्करी कारवाईचा सामना करावा लागेल, जो यापूर्वी कधीही बघितला नसेल.