शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

डोनाल्ड ट्रम्प यांचा डबल गेम...! अद्याप जिंकलेही नाही, पण भारतावर साधला निशाणा; चीनलाही सोडलं नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2024 19:20 IST

मिशिगनमध्ये निवडणूक रॅलीला संबोधित करताना ट्रम्प यांनी केवळ चीनच नव्हे, तर भारतावरही निशाणा साधला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे जगातील एक अत्यंत आक्रमक नेते म्हणून बघितले जाते. ते चीनसंदर्भात बोलतात, तर रशियासंदर्भातही बोलतात. त कधी म्हणतात, मी राष्ट्रपती असोत तर युक्रेन युद्ध झाले नसते. मात्र यावेळी तर त्यांनी थेट भारतावरच निशाणा साधला आहे. मिशिगनमध्ये निवडणूक रॅलीला संबोधित करताना ट्रम्प यांनी केवळ चीनच नव्हे, तर भारतावरही निशाणा साधला आहे.

चीनवर हल्ला चढवताना ट्रम्प म्हणाले, चीनला वाटते की, आपण येथे काहीतरी बनवावे आणि त्यांच्याकडे पाठवावे. म्हणजे त्यांना त्यावर 250% टॅरिफ लावता येईल. यानंतर, ऑफर करतील की, या आपला प्‍लांट लावा. मह या कंपन्या तेथे जातात. यानंतर ट्रम्प यांनी यांनी भारतावरही निशाणा साथला. भारतासंदर्भात बोलताना टम्प म्हणाले, हार्ले डेव्हिडसनसोबत भारतानेही हेच केले. हार्ले डेव्हिडसनवर भारताने 200 टक्के टेरिफ लावले. यानंतर त्यांना त्यांची दुचाकी तेथे विकता आली नाही.

'द्यावा लागतोय 200% टेरीफ' -ट्रम्प यांनी अद्याप निवडणूकही जिंकलेली नाही, मात्र ते अगदी राष्ट्रपती असल्यासारखे बोलत आहेत. या रॅलीत ते म्हणाले, मला हार्ले डेव्हिडसनचे प्रमुख भेटले होते. त्यांचे बोलणे ऐकून मी अत्यंत निराश झालो. 2018 मध्ये त्याच्या कंपनीने भारतात 5 ते 50 लाख रुपयांपर्यंतच्या बाइक्स लाँच केल्या. तेव्हा मी त्यांना विचारले होते की, आपला भारतातील व्यवसाय कसा सुरू आहे? यावर ते म्हणाले, चांगला सुरू नाही. आम्हाला 200% टेरिफ द्यावा लागत आहे. पण ते आमच्यावर एवढा टेरिफ का लावतात? अखेर त्यांना प्लांट लावण्यासाठी भाग पाडले गेले, असे ट्रम्प म्हणाले. 

अमेरिकेतील या निवडणुकीत ट्रम्प यांनी जशीच्या तशी उचलली भाजपची घोषणा -आता अमेरिकेतील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाने भाजप अथवा पंतप्रधान मोदींची घोषणा जशीच्या तशी उचलली आहे. रिपब्लिकन पक्षाने 'अबकी बार 400 पार' चा नारा दिला आहे. हीच घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणूक-2024 मध्ये दिली होती. यावेळचे वातावरण पाहता, 400 इलेक्टोरल मतांचा आकडा ओलांडला जाऊ शकतो, असे डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांना वाटते. 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाElectionनिवडणूक 2024Indiaभारतchinaचीन