डोनाल्ड ट्रम्प यांना मतदान करुन चूक झाली, अमेरिकेच्या नागरिकांना होतोय पश्चाताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 18:24 IST2025-03-04T18:23:44+5:302025-03-04T18:24:03+5:30
US Citizens about Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पदभार स्वीकारल्यापासून एकापाठोपाठ एक मोठे मोठे घेत आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांना मतदान करुन चूक झाली, अमेरिकेच्या नागरिकांना होतोय पश्चाताप
Survey on Donald Trump’s Presidency: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पदभार स्वीकारल्यापासून एकापाठोपाठ एक मोठे मोठे घेत आहेत. यातील प्रमुख निर्णयांमध्ये युक्रेनला दिली जाणारी लष्करी मदत थांबवणे, अनेक देशांवर ज्यादा शुल्क आकारणे आणि अवैध स्थलांतरितांना देशातून हद्दपार करणे...यांसारख्या निर्णयांचा समावेश आहे. एकीकडे डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे समर्थक सुरुवातीपासूनच या निर्णयांना देशाच्या विकासाशी जोडत आहेत, तर दुसरीकडे अमेरिकेतील जनता या निर्णयांवर नाखूश असल्याचे दिसत आहे.
सीबीएसने केले सर्वेक्षण
अमेरिकन मीडिया सीबीएसने एक सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणानुसार, ट्रम्प आता ज्या मुद्द्यांसह निवडणूक जिंकून राष्ट्राध्यक्ष झाले, त्या सर्व मुद्द्यांच्या विरुद्ध गोष्टी करत असल्याचे अमेरिकन नागरिकांचे म्हणणे आहे. महागाईपासून दिलासा देण्यासाठी ट्रम्प यांनी मोठा निर्णय घेतला असता, तर देशाच्या प्रगतीत भर पडली असती, असे मतदारांचे म्हणने आहे.
मतदारांना होतोय पश्चाताप ...
सीबीएसने केलेल्या सर्वेक्षणात 82 टक्के अमेरिकन नागरिकांनी सांगितले की, आम्हाला अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी काम करायचे आहे. महागाईपासून दिलासा देण्यासाठी सरकारने काम करायला हवे, असे 80 टक्के लोकांनी सांगितले. तर, 59 टक्के लोक करात सूट देण्याची मागणी करत आहेत. केवळ 51 टक्के लोकांना मेक्सिको सीमेचा मुद्दा महत्त्वाचा वाटतो, तर 73 टक्के लोकांनी सांगितले की, ट्रम्प मेक्सिको सीमा विवादाला विनाकारण अधिक महत्त्व देत आहेत.
याशिवाय, 69 टक्के अमेरिकन लोकांचे म्हणणे आहे की, ट्रम्प सरकार सर्वांच्या नोकऱ्या काढून घेण्यात अधिक रस घेत आहे. मात्र, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प महागाईबाबत गंभीर असल्याचे केवळ 29 टक्के लोकांना वाटते. यावरुन असे दिसून येते की, डोनाल्ड ट्रम्प यांना पुन्हा सत्तेवर आणून अमेरिकन मतदारांना पश्चाताप होत आहे.
किती टक्के अमेरिकन नागरिकांचा युक्रेनला पाठिंबा ?
या सर्वेक्षणात समाविष्ट असलेल्या 52 टक्के लोकांनी युक्रेनला पाठिंबा दिला आहे. तर, रशियाच्या समर्थनार्थ केवळ 4 टक्के लोक आले. विशेष म्हणजे, शुक्रवारी (28 फेब्रुवारी) व्हाईट हाऊसमध्ये ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्या चर्चेपूर्वी हे सर्वेक्षण केले गेले आहे. 51 टक्के लोकांचे म्हणणे आहे की, युक्रेनला होणारा शस्त्रास्त्र पुरवठा थांबवणे ट्रम्प यांचे चुकीचे होते.