शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

इराणमधील शाळेवरील भीषण हल्ल्यामागे अमेरिकेचाच हात; टॉमहॉक क्षेपणास्त्रानेच घेतला १६५ विद्यार्थ्यांचा बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 06:10 IST

'बेलिंगकॅट'च्या तीन सेकंदांच्या व्हिडीओने अमेरिकेचा बुरखा फाडला, ट्रम्प यांचा दावा खोटा, अमेरिकेच्या अडचणींत वाढ

जेरुसलेम : मध्यपूर्वेतील सुरू असलेल्या युद्धाच्या सुरुवातीला इराणमधील एका शाळेवर झालेला हल्ला हा इराणनेच केल्याचा आरोप अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता; पण नव्या पुराव्यांमुळे ट्रम्प संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. आंतरराष्ट्रीय तपास संस्था ‘बेलिंगकॅट’ने प्रसिद्ध केलेल्या व्हिडीओतून हा हल्ला अमेरिकेकडून झाल्याचे म्हटले आहे.    २८ फेब्रुवारी रोजी इराणच्या दक्षिणेकडील हॉर्मोझगान प्रांतातील मिनाब येथे रिव्होल्युशनरी गार्डच्या तळाजवळ असलेल्या शाळेवर हा हल्ला झाला होता. या हल्ल्यात १६५ हून अधिक जण ठार झाले होते, यात मोठ्या संख्येने विद्यार्थी होते. या घटनेनंतर संपूर्ण जगात संताप व्यक्त झाला होता. पण, या हल्ल्याला अमेरिकेने इराणलाच जबाबदार धरले होते. 

बेलिंगकॅटने प्रसिद्ध केलेला तीन सेकंदांचा व्हिडीओ त्या दिवशीचा असल्याचे सांगितले आहे. या व्हिडीओत क्षेपणास्त्र एका इमारतीवर कोसळताना दिसते. ही इमारत शाळेजवळ होती. हे क्षेपणास्त्र टॉमहॉक होते असे तपास संस्थेचे संशोधक ट्रेव्हर बॉल यांचे म्हणणे आहे. हे क्षेपणास्त्र अतिशय संहारक असून, ते या संघर्षात फक्त अमेरिकेकडे आहे. अमेरिकेने ज्या ठिकाणी हल्ला केला ती शाळा रिव्होल्युशनरी गार्डच्या तळाजवळ आणि नौदलाच्या छावणीच्या परिसरात होती. अमेरिकेने या भागात हल्ले केल्याचे मान्य केले आहे. इस्रायलने या हल्ल्यात आपण सामील नव्हतो असे स्पष्ट केले होते. 

भारतीय जखमी

जेरुसलेम : इस्रायलवर इराणकडून रविवारी झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात एका भारतीय नागरिकाच्या मानेत क्षेपणास्त्राच्या तुकड्यातील अणकुचीदार कण घुसल्याने तो जखमी झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी सोमवारी दिली. या व्यक्तीवर तेल अवीव येथील इचिलोव रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.

‘भारतीयाचा मृत्यू नाही’

दुबई : सौदी अरेबियातील अल खार्ज या वसाहतीवर इराणने डागलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात कोणत्याही भारतीय नागरिकाचा मृत्यू झालेला नाही, अशी माहिती रियाध येथील भारतीय दूतावासाने दिली. रविवारीच्या घटनेत भारतीय नागरिक जखमी झाला असून त्याच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, असे दूतावासाने सांगितले होते. 

इस्रायलकडून संहारक ‘व्हाइट फॉस्फरस’चा वापर

१. बैरूत : इस्रायलच्या सैन्याने दक्षिण लेबनॉनवरील हल्ला करताना व्हाइट फॉस्फरसयुक्त तोफगोळ्यांचा वापर केला आहे. हे रसायन अत्यंत ज्वलनशील असून त्याचा वापर बेकायदा असल्याचा गंभीर आरोप आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना ‘ह्युमन राइट्स वॉच’ने केला.

२. या संघटनेने ७ छायाचित्रांचे भू-स्थान तपासून व पडताळणी करून सांगितले की इस्रायलने योहमोर या गावातील निवासी भागांवर तोफांद्वारे व्हाइट फॉस्फरसचे हल्ले केले. हा हल्ला इस्रायली सैन्याने येथील रहिवाशांना स्थलांतराची सूचना दिल्यानंतर काही तासांत केला होता. या हल्ल्यात किती मृत वा जखमी झाले याची माहिती अद्याप मिळालेली नाही. 

कायद्याचे उल्लंघन

१. लोकवस्ती असलेल्या भागात व्हाइट फॉस्फरसचा वापर आंतरराष्ट्रीय कायद्याने निषिद्ध आहे. ही रसायनयुक्त आग इमारतींना पेटवू शकते आणि मानवी शरीर जाळून हाडांपर्यंत पोहोचते. या रसायनांचा जिवंत बचावलेल्यांना संसर्ग होऊ शकतो. 

२. अवयव निकामी होऊ शकतात किंवा श्वसनसंस्थेचे गंभीर आजार होऊ शकतात, असे या संघटनेचे म्हणणे आहे. इस्रायलचे हे कृत्य बेकायदा असून चिंताजनक आहे. याचा परिणाम गंभीर आहे, असे या संघटनेने म्हटले आहे. इस्रायलने या आरोपांवर तत्काळ प्रतिक्रिया दिलेली नाही. 

English
हिंदी सारांश
Web Title : Report alleges US responsible for Iran school attack; many dead.

Web Summary : A report suggests the US was behind an Iranian school attack that killed many, potentially using Tomahawk missiles. Israel denies involvement. Separately, an Indian was injured in an Iranian missile attack in Israel. Concerns rise over Israel's use of white phosphorus in Lebanon.
टॅग्स :AmericaअमेरिकाIranइराणIsraelइस्रायलWarयुद्ध