शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2026 12:38 IST

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः या थरारक मोहिमेची पुष्टी केली. ट्रम्प यांनी याला अमेरिकन इतिहासातील सर्वात धाडसी 'सर्च अँड रेस्क्यू' ऑपरेशन्सपैकी एक म्हटले आहे...

मध्यपूर्वेत सुरू असलेल्या भीषण युद्धात इराणमध्ये कोसळलेल्या अमेरिकन लढाऊ विमानातील वायू सैनिकाला अमेरिकेने एक अत्यंत धाडसी आणि थरारक मोहीम आखत सुरक्षितपणे बाहर काढले. खरेतर ही मोहीम तांत्रिकदृष्ट्या अत्यंत कठीण होती. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः या थरारक मोहिमेची पुष्टी केली. ट्रम्प यांनी याला अमेरिकन इतिहासातील सर्वात धाडसी 'सर्च अँड रेस्क्यू' ऑपरेशन्सपैकी एक म्हटले आहे.

इराणने अमेरिकन हवाई दलाचे F-15E स्ट्राईक ईगल विमान दक्षिण इराणमध्ये पाडले होते. विमानात एक पायलट आणि एक वेपन सिस्टम ऑफिसर असे दोन क्रू मेंबर्स होते. विमानाला आग लागण्यापूर्वीच दोघांनी यशस्वीपणे इजेक्ट केले. पायलटला काही तासांतच वाचवण्यात अमेरिकेला यश आले. मात्र दुसऱ्या क्रू मेंबरचा शोध घेणे जरा आव्हानात्मक ठरले. हा सैनिक इराणच्या दुर्गम डोंगराळ भागात लपून शत्रू सैन्यापासून स्वतःचा बचाव करत होता. सुमारे एक दिवस हा सैनिक शत्रूच्या जबड्यात एकटाच होता. पकडले जाण्यची  भीतीही होती. मात्र त्याला शोधण्यात अमेरिकेला यश आले.

या बचाव मोहिमेसंदर्भात काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? - राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या मोहिमेसंदर्भात त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर माहिती दिली आहे. त्यांनी लिहिले, "आम्ही त्याला शोधून काढले. ही आपल्या इतिहासातील सर्वात धाडसी शोध आणि बचाव मोहिमांपैकी एक आहे. हा शूर सैनिक इराणच्या पर्वतांमध्ये, शत्रूच्या प्रदेशात लपलेला होता. शत्रू त्याचा शोध घेत होते." तसेच, संबंधित वैमानिकाच्या प्रकृतीसंदर्भात सांगताना ट्रम्प म्हणाले, "तो काही दुखापत जाली आहे, तो पूर्णपणे बरा होईल."

सीआयएची म्हत्वाची भूमिका - अमेरिकन गुप्तचर संस्था 'सीआयए'ने (CIA) या मोहिमेसंदर्भात महत्त्वाची भूमिका बजावली. शत्रूची दिशाभूल करण्यासाठी सीआयएने वैमानिक आधीच सापडल्याची अफवा पसरवली आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने त्याचे नेमके लोकेशन शोधून सैन्याला दिले. बचाव मोहिमेदरम्यान अमेरिकन स्पेशल फोर्सेसने जोरदार हवाई संरक्षण (Fire Cover) आणि गरजेनुसार एअरस्ट्राइकचा वापर करत आपल्या सैनिकाला बाहेर काढले.

English
हिंदी सारांश
Web Title : Trump Reveals Daring Rescue of Soldier from Enemy Territory in Iran

Web Summary : Trump confirmed a daring US rescue operation in Iran, saving a soldier from enemy capture. The CIA played a key role in locating the soldier amidst challenging terrain, marking a significant success.
टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पIranइराणAmericaअमेरिकाSoldierसैनिक