शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंत्र्यावर बिबटे सोडा', उद्या पाकिस्तानातील लोक मंत्री म्हणून येतील', सुधीर मुनगंटीवारांचा विधानसभेत पारा चढला!
2
पडळकर-आव्हाड समर्थक राडा प्रकरणी अहवाल सादर; "'त्या' कार्यकर्त्यांना २ दिवस कारावास अन्..."
3
तंबाखू आणि सिगारेट महागणार! केंद्र सरकारकडून उत्पादन शुल्कात ५ पट वाढ; नवीन किंमत काय असेल?
4
विधानसभेत मंत्री नितेश राणेंची कोपरखळी; "काल चिडलेले होते, वैयक्तिक भेटले तर मिठीही मारतात..."
5
पहिला अंडरवर्ल्ड डॉन हाजी मस्तानच्या मुलीची पंतप्रधानांना साद; 'माझ्यावर वारंवार बलात्कार, मदत करा, न्याय द्या'
6
रिस्क है तो...! कार डीलरचा मुलगा ते शेअर बाजाराचा 'बिग बुल'; हर्षद मेहताचा 'वाद'ळी प्रवास
7
“श्रमलेल्या बापासाठी लेक...”; शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त सुप्रिया सुळेंची खास पोस्ट
8
रुपयाचा ऐतिहासिक नीचांक! डॉलरच्या तुलनेत दर ९०.५६ रुपये; घसरण्याची ३ मोठी कारणे समोर
9
एकाच रिचार्जमध्ये मिळणार वाय-फाय, फोन आणि डीटीएच, हा प्लान खूप खास
10
Video - "तुला लाज वाटली नाही?"; नवऱ्याने बायकोला बॉयफ्रेंडसोबत OYO मध्ये रंगेहाथ पकडलं अन्...
11
मुलानं आईला मारलं, मग स्वतःलाही संपवलं; ChatGPT कारणीभूत? OpenAI वर खटला!
12
Kankavli: हरवलेल्या मोबाईलमुळे ‘त्या’ प्रेमी युगुलानं संपवलं जीवन, तपासातून धक्कादायक माहिती समोर   
13
आश्चर्यकारक! Tata च्या नवीन Sierra ने दिले 30 kmpl चे मायलेज; 222 kmph चा टॉप स्पीडही गाठला
14
हिरा निघाला 'हा' शेअर; ९० टक्के फायद्यावर लिस्टिंग, IPO मध्ये लागलेली फक्त २ पट बोली
15
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, सोनं 1.34 लाख पार तर चांदी 2 लाखांच्या उंबरठ्यावर; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
16
मॅक्सिको भारतावर नाही तर आपल्याच प्रगतीवर टाळं लावतोय, फेडावी लागेल मोठी किंमत
17
कोथरुडमध्ये मिळू लागले अवघ्या ८६ रुपयांना लीटर पेट्रोल; वाहनचालकांची उडाली झुंबड...
18
China Condom Tax: चीनमध्ये कंडोमवर भरपूर टॅक्स लादणार, जिनपिंग यांच्या धोरणाला विरोध का होतोय?
19
प. बंगालमध्ये आता बांधले जाणार राम मंदिर; भाजपा नेत्यांनी लावले पोस्टर, देणगी देण्याचे आवाहन
20
विनेश फोगाटचा यू-टर्न! पुन्हा कुस्तीच्या आखाड्यात परतणार, निवृत्तीचा निर्णय रद्द, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिका हबकली! चीनने दक्षिण समुद्रात दोन 'किलर' मिसाईल डागली; युद्धनौका उद्ध्वस्त करण्याची शक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2020 16:00 IST

चीनने वादग्रस्त दक्षिण चीन समुद्रात मिसाईल डागून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. चीनचे वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे. चीनने 'कॅरियर किलर' नावाने दोन प्रसिद्ध मिसाईल दक्षिण चीन समुद्रात डागली आहेत.

चीन आणि अमेरिकेदरम्यानचा वाद काही कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. अमेरिकेच्या दोन टेहळणी विमानांनी चीनच्या हद्दीत घुसून सैन्य तळावरच्या हालचाली टिपल्या होत्या. यावर चीनने आक्षेप नोंदविला होता. ही घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. तर काही आठवड्यांपूर्वी अमरिकेच्या लढाऊ विमानांनी शांघायपासून 75 किमी अंतरावर फेरफटका मारला होता. आता चीनने या कृत्याला जोरदार प्रत्यूत्तर दिले आहे. 

 चीनने वादग्रस्त दक्षिण चीन समुद्रात मिसाईल डागून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. चीनचे वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे. चीनने 'कॅरियर किलर' नावाने दोन प्रसिद्ध मिसाईल दक्षिण चीन समुद्रात डागली आहेत. ही मिसाईल डागण्यामागे अमेरिकेला घाबरविणे आणि इशारा देणे आहे. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार बुधवारी DF-26B आणि DF-21D  ही दोन घातक मिसाईल हैनान आणि पारसेल बेटादरम्यान डागण्यात आली. ही मिसाईल मध्यम पल्ल्याची जरी असली तरी ती अचूक निशाना लावण्यात तरबेज आहेत. ही बॅलेस्टिक मिसाईल डागल्यामुळे या भागातील हवाई वाहतूक काही काळासाठी थांबविण्यात आली होती. 

काही दिवसांपूर्वी अमेरिकेची युद्धनौका रोनाल्ड रीगनने पारसेल बेटाजवळ युद्धाभ्यास केला होता. त्यालाच उत्तर देण्यासाठी चीनने ही मिसाईल डागल्याचे मानले जात आहे. अमेरिकेच्या U2 या टेहळणी विमानांच्या घुसखेरीमुळेही चीन नाराज आहे. DF-21D मिसाईलला कॅरिअर किलर म्हटले जाते. जर हे मिसाईल कोणत्याही युद्धनौकेवर डागल्यास ती युद्धनौका पूर्णपणे उद्ध्वस्त होते. DF-26B या मिसाईलला क्विंघाई प्रांतातून डागण्यात आले होते. तर DF-21D मिसाईल शांघायच्या दक्षिणेकडील झेजियांग प्रांतातून डागण्यात आले होते. चीनच्या संरक्षण मंत्रालयाने यावर एक वक्तव्य प्रसिद्ध केले आहे. ही कारवाई एक सरावाचा भाग होती. प्रवक्ते वू कीन यांनी सांगितले की, अमेरिकेच्या टेहळणी विमानांनी चीनला उकसवले आहे. यामुळे ही मिसाईल डागण्यात आली आहेत. अमेरिकेने असे प्रकार थांबवावेत. जर अमेरिका असेच युद्धाभ्यास आणि लढाऊ विमानांची उड्डाणे सुरु ठेवणार अ,सेल तर चीनही त्याचा प्रत्यूत्तर देईल. 

 

पहिली गोळी झाडणार नाही...दक्षिण चीन समुद्रात सुरु असलेल्या युद्धाभ्यासावेळी अमेरिका आणि चीनमध्ये तणाव वाढू लागला होता. यावर चीनने आपल्या सैनिकांना नरमाईचे आदेश दिले असून अमेरिकी सैन्य़ावर कोणत्याही परिस्थितीत पहिली गोळी चालवू नका, असे निर्देश दिले आहेत. अमेरिकेचे आरोग्य मंत्री चार दशकांनंतर तैवानच्या दौऱ्यावर असताना चीनचे हे आदेश आले आहेत. दक्षिण समुद्रातील वादग्रस्त भागात सध्या चीन आणि अमेरिका दोन्ही देश सैन्याची ताकद वाढवू लागले आहेत. या साऊथ चायना सीवर चीनची कम्युनिस्ट पार्टी दावा सांगत आली आहे. या वादग्रस्त क्षेत्रात आता अमेरिका सारखा दबाव वाढवत असून अशात दोन्ही अण्वस्त्र संपन्न देशांमध्ये युद्ध होण्याचे संकेत आहेत. यामुळे चीन वाढता तणाव कमी करू इच्छित आहे. कारण सध्या अमेरिकेत निवडणुकीचे वारे असून कट्टरवादी गट या तणावाचा फायदा घेण्याची भीती चीनला वाटू लागली आहे. असे झाल्यास दोन्ही देशांमधील संबंध भविष्यात बिघडण्याची शक्यता आहे. यामुळे चीनने त्यांच्या लढाऊ विमानांच्या पाय़लटांना आणि नौसेनेला अमेरिकेच्या युद्धनौका आणि लढाऊ विमानांच्या दळणवळणाला प्रतिकार न करण्यासाठी संयम बाळगण्याचे आदेश दिले आहेत. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

TikTok चे सीईओ केविन मेयर यांचा राजीनामा; अमेरिकेचा मोठा दबाव

सुशांत राजपूत: "तीन महिन्यांपासून सुरु होते Black Magic"; रियाच्या घरी गोंधळ उडाला

Video: जग पुन्हा हादरले! रशियाने सर्वात शक्तीशाली, संहारक अणुबॉम्ब जगासमोर आणला

रेल्वेमध्ये भरती, मुलाखत...; 50 जणांकडून उकळले 1 कोटी

लडाखमध्ये परिस्थिती खूपच गंभीर; परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची कबुली

बडे काम की चीज! LIC ने आणली नवी पॉलिसी; आयुष्यभर देणार उत्पन्न

टॅग्स :chinaचीनAmericaअमेरिका