'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2025 18:10 IST2025-11-02T17:54:03+5:302025-11-02T18:10:43+5:30
शेख हसीना यांनी पहिल्यांदाच मौन सोडले. 'सत्तेवरून काढून टाकण्यासाठी विद्यार्थी आंदोलन हा "अमेरिका आणि पाकिस्तानने रचलेला दहशतवादी कट होता", असा आरोप शेख हसीना यांनी केला. त्यांनी मुहम्मद युनूस यांच्यावर अमेरिकेच्या इशाऱ्यावरून कट रचल्याचा आरोप केला.

'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी देश सोडल्यानंतर पहिल्यांदाच उघडपणे प्रतिक्रिया दिली. देशातील विद्यार्थ्यांच्या निदर्शनांनंतर झालेल्या बंडानंतर शेख हसीना यांनी एक निवेदन जारी केले. 'माझ्याविरुद्ध विद्यार्थ्यांची निदर्शने हा अमेरिकेने रचलेला आणि पाकिस्तानने घडवून आणलेला दहशतवादी हल्ला होता', असा आरोप शेख हसीना यांनी केला.
शेख हसीना म्हणाल्या, गेल्या वर्षी जुलै-ऑगस्टमधील घटना सत्तेवरून काढून टाकण्याच्या उद्देशाने केलेल्या परदेशी कटाचा भाग होता. याला क्रांती म्हणू नका! हा बांगलादेशवरील दहशतवादी हल्ला होता, जो अमेरिकेने आखला होता आणि पाकिस्तानमधून राबवला गेला होता आणि विद्यार्थी उठावाच्या रूपात सादर केला होता. मला सत्तेवरून काढून टाकण्यासाठी हा हल्ला करण्यात आला होता. माझ्या सरकारवर आरोप असलेले खून पोलिसांनी केले नव्हते तर दहशतवाद्यांनी केले होते, जेणेकरून जनतेला माझ्याविरुद्ध भडकवले जाईल", असंही शेख हसीना म्हणाल्या.
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
मुहम्मद युनूस यांच्यावर आरोप
हसिनाने थेट नोबेल पुरस्कार विजेते मुहम्मद युनूस यांच्यावर अमेरिकन लोकांच्या इशाऱ्यावरून त्यांना सत्तेवरून हाकलून लावण्याचा कट रचल्याचा आरोप केला. 'अमेरिकन लोकांना बंगालच्या उपसागरातील धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचे असलेले सेंट मार्टिन बेटावर नियंत्रण हवे होते,असा दावा त्यांनी केला.
शेख हसीना म्हणाल्या, "या सर्वामागील खरा व्यक्ती कोण आहे हे तुम्हाला माहिती आहे का? ते युनूस आहेत. अमेरिकन लोकांना सेंट मार्टिन बेट माझ्याकडून हवे होते. जर मी सहमती दर्शविली असती तर त्यांनी मला सत्तेवरून काढून टाकले नसते. पण मी माझा देश विकण्यास नकार दिला."
"युनूस यांनी अमेरिकन लोकांच्या इशाऱ्यावरून गेल्या वर्षी जुलै-ऑगस्टमध्ये बांगलादेशमध्ये दहशतवादी हल्ल्यांची योजना आखली, निधी दिला आणि ती अंमलात आणली. ते एक देशद्रोही आहेत. त्यांनी स्वतःच्या महत्त्वाकांक्षेसाठी स्वतःचा देश उद्ध्वस्त केला."
पाकिस्तानवर निशाणा साधला
शेख हसीना पाकिस्तानवर गंभीर आरोप केले. पाकिस्तानमधील कट्टरपंथी शक्तींनी बांगलादेशातील अतिरेकी नेटवर्कना दीर्घकाळ पाठिंबा दिला आहे. १९७१ पासून हस्तक्षेपाचा हा प्रकार कायम आहे, असा आरोप केला.