शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

आधी ट्रम्प खोटं बोलले, आता पुरस्कार देऊन गोंधळ पसरवला! ऑपरेशन सिंदूरबाबत अमेरिकेचा नवा ड्रामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 13:37 IST

America on India-Pakistan War: अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वारंवार भारत-अमेरिकेतील संघर्ष थांबवल्याचा दावा केला आहे.

America on India-Pakistan War: भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विशेष सहाय्यक रिकी गिल यांना अमेरिकेच्या नॅशनल सिक्युरिटी कौन्सिल (NSC) कडून ‘डिस्टिंग्विश्ड अ‍ॅक्शन अवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले आहे. भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामात महत्वाची भूमिका बजापल्याप्रकरणी हा पुरस्कार देण्यात आल्याची माहिती अमेरिकी सरकारकडून अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे.

अमेरिकन परराष्ट्र मंत्रालय व NSC कडून सन्मान

अमेरिकन परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो आणि राष्ट्रीय सुरक्षा परिषद (NSC) यांच्या वतीने रिकी गिल यांना विशेष सन्मान देण्यात आला. अधिकृत निवेदनानुसार, दक्षिण आशियाशी संबंधित प्रश्नांवर विविध अमेरिकन सरकारी संस्थांमधील समन्वय आणि कूटनीतिक प्रयत्नांमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

भारताची भूमिका स्पष्ट

दरम्यान, ‘ऑपरेशन सिंदूर’च्या काळात पाकिस्तानसोबत झालेल्या युद्धविरामात अमेरिकेची कोणतीही भूमिका नव्हती, असे भारताने स्पष्टपणे सांगितले आहे. भारत सरकारने अनेक वेळा स्पष्ट केले आहे की, भारत-पाक सीजफायर पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या विनंतीनंतर भारताने स्वीकारला होता आणि या प्रक्रियेत कोणत्याही तृतीय पक्षाची भूमिका नव्हती. काश्मीर प्रश्नावरही भारताने तिसऱ्या पक्षाच्या हस्तक्षेपाला स्पष्ट नकार दिला आहे. तरीदेखील अमेरिकेकडून वारंवार युद्धविरामात महत्वाची भूमिका बजावल्याचा दावा केला जातोय.

‘डिस्टिंग्विश्ड अ‍ॅक्शन अवॉर्ड’चे महत्त्व

NSC कडून दिला जाणारा ‘डिस्टिंग्विश्ड अ‍ॅक्शन अवॉर्ड’ हा संस्थेतील सर्वात प्रतिष्ठेच्या अंतर्गत सन्मानांपैकी एक मानला जातो. राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित विषयांमध्ये असाधारण योगदान देणाऱ्या अधिकाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, रिकी गिल यांची निवड त्यांच्या धोरणात्मक समन्वय आणि कूटनीतिक कौशल्यामुळे करण्यात आली.

ट्रम्प प्रशासनातील रिकी गिल यांची भूमिका

नॅशनल सिक्युरिटी कौन्सिल (NSC) ही अमेरिकी राष्ट्राध्यक्षांना परराष्ट्र धोरण आणि राष्ट्रीय सुरक्षेबाबत सल्ला देणारी महत्त्वाची संस्था आहे. रिकी गिल सध्या अमेरिकी प्रशासनात वरिष्ठ पदावर कार्यरत असून, धोरण समन्वय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींवर ते काम करत आहेत. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : US Award to Official Sparks India-Pakistan War Mediation Row

Web Summary : America honored an official for mediating India-Pakistan ceasefire. India denies US involvement, stating it accepted Pakistan's request directly. Despite India's stance, US repeatedly claims a role, raising questions about motives and historical accuracy.
टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पOperation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाIndiaभारतPakistanपाकिस्तान