शहरं
Join us  
Trending Stories
1
डॉक्टर महिलेच्या हातावरील हस्ताक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ
2
८ वर्षाचं नातं क्षणातच विसरली, पत्नीनं केलेल्या कांडामुळे पती झाला शॉक; चिठ्ठी लिहिली अन्...
3
MCX वर आपटले होते, पण सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर वाढले, खरेदी करणार असाल तर पाहा लेटेस्ट रेट
4
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
5
Mumbai Crime: "शेवटचे दिवस जवळ आलेत", भावेश शिंदे घरातून बाहेर पडला आणि मुंबई लोकलखाली संपवले आयुष्य
6
निष्काळजीपणाचा कळस! रुग्णालयात महिलेला लावलं एक्सपायर्ड ग्लुकोज, तोंडातून फेस आला अन्...
7
बिहार निवडणुकीच्या रणधुमाळीतच भाजपची मोठी कारवाई, चार नेत्यांची पक्षातून हकालपट्टी; करण्यात आले गंभीर आरोप
8
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
9
“महायुतीचे शेतकरी पॅकेज थोतांड, कर्जमाफी करावी; राज्य दिवाळखोरीत काढले”: हर्षवर्धन सपकाळ
10
EPF खातेधारकांना मोठी भेट! 'फ्री'मध्ये मिळतोय ₹७ लाखांपर्यंतचा जीवन विमा; कुटुंबाला मिळेल मोठा आधार
11
२० वर्षीय भारतीय तरुणीवर ब्रिटनमध्ये बलात्कार, आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद; वर्णद्वेषातून कृत्य
12
भारताच्या 'या' राज्यांवर बांगलादेशची नजर; युनूस यांनी पाकिस्तानला सोपवला वादग्रस्त नकाशा
13
मर्डर मिस्ट्री! क्राइम सीरीज पाहून तरुणीने घेतला लिव्ह इन पार्टनरचा जीव, 'असं' उलगडलं गूढ
14
CJI गवईंनी शिफारस केलेले न्या. सूर्यकांत कोण? ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव; कधीपर्यंत असणार CJI?
15
प्रमोद महाजन यांची हत्या का झाली?  १९ वर्षांनंतर भाऊ प्रकाश महाजन यांचा धक्कादायक गौप्यस्फोट, म्हणाले...
16
Phaltan Doctor Death: "डॉक्टर तरुणीवर माझ्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला", दीपाली निंबाळकर प्रकरणाने वेगळं वळण
17
Viral Video: विरुद्ध दिशेनं येणाऱ्या ट्रकचालकाचं नियंत्रण सुटलं अन्...; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ!
18
AGR प्रकरणी Vodafone Idea ला सर्वोच्च न्यायालयाकडून मिळाली संजीवनी; शेअर्समध्ये जबरदस्त वाढ
19
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत

अमेरिकेचा ५० वर्षांनंतर चंद्रावर नवा विक्रम! पहिले खाजगी अंतराळयान दक्षिण ध्रुवावर उतरवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2024 11:29 IST

१९७२ नंतर पुन्हा एकदा अमेरिकेचे एखादे अंतराळयान चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करण्यात यशस्वी झाले आहे

America Odysseus spacecraft  on Moon: जवळपास ५० वर्षांत प्रथमच अमेरिकन अंतराळयान चंद्रावर उतरले आहे. चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारे याआधीचे अमेरिकन यान १९७२ मध्ये उतरले होते. ते मिशन अपोलो 17 होते. त्यानंतर आता ५० वर्षांनी चंद्रावर उतरलेल्या लँडरचे नाव आहे - ओडिसियस लँडर. हे ह्यूस्टनच्या इंट्यूटिव्ह मशीन्सने बनवले आहे. नासाच्या म्हणण्यानुसार, भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 4:53 वाजता त्याचे लँडिंग झाले. चंद्रावर उतरणारे हे खासगी कंपनीचे पहिले अंतराळयान ठरले आहे. जेव्हा ओडिसियस लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरला तेव्हा काही बिघाडामुळे टीमचा अवकाशयानाशी संपर्क तुटला. परंतु शास्त्रज्ञांनी सांगितले की ते सुरक्षितपणे उतरले आहे आणि कार्यरत आहे. हे लँडिंग व्यावसायिक अवकाशयान आणि अमेरिकन अवकाश उद्योगासाठी मैलाचा दगड मानला जात आहे.

मिशन ७ दिवस राहणार सक्रिय

हे यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरले आहे. अमेरिकेचे हे मिशन ७ दिवस सक्रिय राहणार आहे. कारण थंडीमुळे अवकाशयान बिघडू शकते. यासह दक्षिण ध्रुवावर उतरणारा अमेरिकाभारतानंतर दुसरा देश ठरला आहे. 23 ऑगस्ट 2023 रोजी चांद्रयान-3 च्या यशस्वी लँडिंगसह चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा पहिला देश ठरला. ओडिसियसचे लँडिंग १४ फेब्रुवारी रोजी होणार होते, परंतु तांत्रिक कारणांमुळे ते पुढे ढकलावे लागले.

अमेरिका २०२६ मध्ये चंद्रावर मानव उतरण्याच्या तयारीत

चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणाऱ्या पाच देशांपैकी अमेरिका एक आहे. तथापि, हा एकमेव देश आहे ज्याचे अंतराळवीर चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या उतरले आहेत. पुढील वर्षी पुन्हा चंद्राभोवती अंतराळवीर पाठवण्याचे अमेरिकेचे लक्ष्य आहे. याशिवाय, २०२६ मध्ये चंद्राच्या पृष्ठभागावर लँडिंग होणार आहे, जे ५० वर्षांहून अधिक काळानंतर चंद्रावर पहिले मानव लँडिंग असेल.

टॅग्स :AmericaअमेरिकाIndiaभारतChandrayaan-3चंद्रयान-3