अमेरिकेत शीख नागरिकाला अमानुष मारहाण

By Admin | Updated: October 8, 2016 13:39 IST2016-10-08T13:39:31+5:302016-10-08T13:39:31+5:30

अमेरिकेमध्ये भारतीय वंशाच्या शीख व्यक्तीला काही अज्ञातांनी जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे. मानसिंग खालसा असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

In America, a non-violent assault of a Sikh citizen | अमेरिकेत शीख नागरिकाला अमानुष मारहाण

अमेरिकेत शीख नागरिकाला अमानुष मारहाण

 लोकमत ऑनलाइन

कॅलिफॉर्निया,दि.8 - अमेरिकेमध्ये भारतीय वंशाच्या शीख व्यक्तीला काही अज्ञातांनी जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे. मानसिंग खालसा असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते 41 वर्षांचे असून कॅलिफॉर्नियामध्ये आयटी तज्ज्ञ म्हणून काम करत आहेत. अज्ञातांनी केलेल्या मारहाणीत त्याच्या हात, डोळे, चेह-याला गंभीर दुखापत झाली आहे. 25 सप्टेंबर रोजी रात्री कामाहून घरी परतत असताना, 20 ते 30 वयोगटातील 5 ते 6 तरुणांच्या टोळक्याने त्यांच्या गाडीवर दारुची बाटली फेकली. यानंतर त्यांचा पाठलाग करत, त्यांच्यावर चाकूने वार केले, त्यांची पगडी पाडली, त्यांचे केस कापले, त्यांना शिवीगाळ करत मारहाण करायला सुरुवात केली, असे खालसा यांनी सांगितले.  
 
याप्रकरणी,  'द शीख कोएलिशन' या अमेरिकेतील शीख समाजाच्या संघटनेने पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे.  खालसा यांना मारहाण करणा-या हल्लेखोरांना तात्काळ अटक करुन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे. 

Web Title: In America, a non-violent assault of a Sikh citizen