शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
2
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
3
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
4
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
5
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
6
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
7
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
8
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड
9
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
10
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
11
IND vs PAK: भारत- पाकिस्तान यांच्यातील ५ टी-२० सामन्यांचा रेकॉर्ड, कुणाचं पारडं जड?
12
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
13
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
14
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
15
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
16
गृहकर्ज घेताय? जाणून घ्या ५० लाखांच्या कर्जावर कोणत्या बँकेत सर्वात कमी ईएमआय
17
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
18
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
19
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
20
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...

आता वाढलं ड्रॅनगनचं टेन्शन!; अमेरिका चीनविरोधात घेऊ शकतो 'सर्वात मोठी' अ‍ॅक्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2020 11:49 IST

सोसायटी फॉर वर्ल्डवाइड इंटरबँक फायनांशिअल टेलिकम्युनिकेशन (SWIFT) एक नेटवर्क आहे. याचा वापर जगभरातील बँकांच्या आर्थिक व्यवहारांची माहिती देण्यासाठी अथवा मिळवण्यासाठी केला जातो.

ठळक मुद्देकोरोना व्हायरसमुळे अमेरिका आणि चीन यांच्यातील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत.ट्रम्प सरकार चीनला यूएस डॉलर सिस्टममधून (SWIFT) बाहेर काढण्याची अथवा त्याचा अ‍ॅक्सेस कमी करण्याची शक्यता आहे.अमेरिकेने ईरान आणि नॉर्थ कोरियाविरोधात असे पाऊल उचलले आहे.

वॉशिग्टन - कोरोना व्हायरसमुळे अमेरिका आणि चीन यांच्यातील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. संबंध बिघडल्यापासून अमेरिकाचीनला सातत्याने धक्के देत आहे. आता ट्रम्प सरकार चीनला यूएस डॉलर सिस्टममधून (SWIFT) बाहेर काढण्याची अथवा त्याचा अ‍ॅक्सेस कमी करण्याची शक्यता आहे. चिनी वृत्तपत्र साउथ चायना मॉर्निंग पोस्टमधील एका वृत्तानुसार, अमेरिका अशा प्रकारचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. यामुळे बिजिंगची चिंता वाढली आहे.

सोसायटी फॉर वर्ल्डवाइड इंटरबँक फायनांशिअल टेलिकम्युनिकेशन (SWIFT) एक नेटवर्क आहे. याचा वापर जगभरातील बँकांच्या आर्थिक व्यवहारांची माहिती देण्यासाठी अथवा मिळवण्यासाठी केला जातो. ज्या पायाभूत सुविधांमुळे आंतरराष्ट्रीय व्यापार आणि गुंतवणुकीत अमेरिन डॉलरची भूमिका अत्यंत महत्वाची आहे, अशा पायाभूत सुविधांचा हा भाग आहे.

वैश्विक दृष्ट्या बँकांचे अमेरिकन बँकांशी संबंध आहेत. याच माध्यमातून त्या अमेरिकन डॉलरचे ट्रांजेक्शन करतात. याच पेमेन्ट सिस्टिमच्या माध्यमाने व्हाईट हाऊस अमेरिकन बँकांना एखादी व्यक्ती, संस्था अथवा देशाशी व्यवहार थांबवण्याचा आदेश देऊ शकते. तसेच, शिनजियांग आणि हाँगकाँग मुद्यावरून संपूर्ण जगाचा विरोध होत असल्याने चीनमधील सत्ताधारी कम्युनिस्ट पक्ष चिंतेत आहे.

सीसीपीच्या काही समर्थकांनी म्हटले आहे, की अमेरिका चीनविरोधात अशाप्रकारचे कठोर पाऊल उचलणार नाही. अमेरिकेने ईरान आणि नॉर्थ कोरियाविरोधात असे पाऊल उचलले आहे. चीन बरोबरही असे केले गेले तर, अमेरिका आणि वैश्विक अर्थव्यवस्थेसाठी धोका अधिक वाढेल. तर काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे, की चीनची भीती अगदी योग्य आहे. कारण संबंध असेच बिघडत राहिले, तर अमेरिका बिजिंगवर हल्ल्यासाठी डॉलर आधिपत्याचाही वापर करू शकते.

अमेरिकेने काही चिनी अधिकारी आणि संस्थांवर बंदी घातली आहे. नुकतेच अमेरिकन परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पिओ यांनी हुआवेईसह काही टेक्नॉलजी कंपन्यांच्या काही अधिकाऱ्यांवर व्हिसा बंदी  घालण्याची घोषणा केली आहे. एवढेच नाही, तर अमेरिकेने चीनला ह्युस्टन येथील चिनी दूतावास बंद करण्याचा आदेश दिला आहे. अशी परिस्थिती असताना चीनला भीती वाटने स्वाभावीक आहे.

महत्त्वाच्या बातम्या -

धक्कादायक! आता 'या' देशाच्या मागे लागला चीन, थेट 'कब्‍जा' करण्याच्या तयारीत; सुरू केली युद्धाची तयारी

भारत-इस्रायलची कमाल!; आता फक्त आवाज अन् श्वासावरून मिळणार कोरोना चाचणीचा अहवाल

CAAचा फायदा घेण्यासाठी रोहिंग्या मुस्लीम करताहेत धर्मांतर, 'या' धर्माचा करत आहेत स्वीकार, सरकार अलर्ट!

CoronaVirus Vaccine : ऑक्सफर्डची लस पास होणार की फेल?; मुंबई-पुण्यात मोठी टेस्ट

100 कोटींचे बजेट, 3 मजले अन् तब्बल 318 खांब... असे असेल अयोध्येतील भव्य राम मंदिर

CoronaVirus : वैज्ञानिकांचा दावा!; कोलेस्टेरॉल कमी करणाऱ्या 'या' औषधाने, फक्त 5 दिवसांत कोरोनाचा खात्मा

टॅग्स :AmericaअमेरिकाchinaचीनUSअमेरिकाUnited Statesअमेरिका