शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

America Israel Iran War: आम्हाला कुणाच्याही मदतीची गरज नाही, मित्र राष्ट्रांनी हात झटकल्यानंतर अमेरिकेचा संताप!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 00:08 IST

America Israel Iran War Updates: मध्य पूर्वेमधील  युद्ध आता एका अत्यंत स्फोटक वळणावर पोहोचले आहे. अमेरिका- इस्रायल आणि इराणवर यांच्यातील सुरू झालेल्या या युद्धात आता जागतिक राजकारणाचे समीकरण बदलताना दिसत आहे.

मध्य पूर्वेमधील  युद्ध आता एका अत्यंत स्फोटक वळणावर पोहोचले आहे. अमेरिका- इस्रायल आणि इराणवर यांच्यातील सुरू झालेल्या या युद्धात आता जागतिक राजकारणाचे समीकरण बदलताना दिसत आहे. इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्याने निर्माण झालेल्या पेचप्रसंगात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांकडे मदत मागितली होती, परंतु नाटो देशांसह जपान आणि ऑस्ट्रेलियानेही लष्करी सहकार्य देण्यास नकार दिला. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर पोस्ट करत मित्र राष्ट्रांना खडे बोल सुनावले आहेत.

ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये मित्र राष्ट्रांच्या भूमिकेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले की, "आमच्या बहुतेक नाटो मित्र राष्ट्रांनी आम्हाला कळवले आहे की, इराणमधील दहशतवादी राजवटीविरुद्धच्या मोहिमेत त्यांना सहभागी व्हायचे नाही. त्यांनी मदतीला नकार दिला आहे. मला याचे आश्चर्य वाटत नाही. कारण नाटो ही एक संस्था आहे, त्यांच्या सुरक्षेसाठी अब्जावधी डॉलर्स खर्च करतो, पण गरजेच्या वेळी ते सोबत नसतात."

मित्र राष्ट्रांच्या मदतीशिवाय अमेरिकेने इराणच्या नाकी नऊ आणले आहे. अमेरिकेने इराणचे नौदल, हवाई दल यंत्रणा पूर्णपणे निकामी केली आहे. इराणच्या जवळपास प्रत्येक स्तरावरील नेत्यांना संपवण्यात आले आहे, जेणेकरून ते पुन्हा कधीही अमेरिकेला किंवा मध्य-पूर्वेला धमकावू शकणार नाहीत.

नाटो देशांशिवाय जपान, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण कोरियानेही मदतीचा हात पुढे न केल्याने ट्रम्प यांनी अमेरिकेने 'एकला चलो रे'ची घोषणा. "जगातील सर्वात शक्तिशाली देश असलेल्या अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष म्हणून मी सांगू इच्छितो की, आम्हाला कोणाच्याही मदतीची गरज नाही आणि गरजही नाही, अशा शब्दांत ट्रम्प यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. 

अमेरिका आणि इस्रायलचा इराणवर संयुक्त हल्ला केला. इराणचे नवीन सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांनी प्रत्युत्तर म्हणून जागतिक व्यापारासाठी महत्त्वाची असलेली होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली. रशिया, चीन आणि जपानसह नाटो देशांनी अमेरिकेच्या लष्करी मोहिमेत सामील होण्यास असमर्थता दर्शवली. या युद्धामुळे जागतिक इंधन पुरवठा आणि सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, ट्रम्प यांच्या या भूमिकेनंतर अमेरिका आता स्वबळावर पुढील पावले उचलणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : US Angered as Allies Refuse Help in Iran Conflict

Web Summary : Trump expresses anger as allies decline military support against Iran. America asserts self-reliance, claiming to have crippled Iran's forces. The Hormuz Strait closure intensifies global concerns, signaling America's independent stance.
टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पWarयुद्धAmericaअमेरिकाIranइराणIsraelइस्रायल