अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 17:49 IST2026-04-08T17:49:06+5:302026-04-08T17:49:41+5:30

America-Israel-Iran War: पाकिस्तानच्या मध्यस्थीने झालेल्या युद्धविरामाबाबत इराणनने अविश्वास व्यक्त केला आहे.

America-Israel-Iran War: No trust in America, Russia-China should guarantee security; Iran's big demand | अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...

अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...

America-Israel-Iran War: इराण, अमेरिका आणि इस्त्रायल यांच्यात गेल्या ४० दिवसांपासून सुरू असलेल्या संघर्षावर अखेर तात्पुरता विराम लागला आहे. दोन्ही बाजूंनी पुढील १५-२० दिवस एकमेकांवर हल्ला न करण्यास सहमती दर्शवली आहे. मात्र, इराणने अमेरिकेवर अविश्वास व्यक्त करत हे युद्धविराम टिकेल का, याबाबत शंका उपस्थित केली आहे.

अमेरिका करार मोडू शकतो 

चीनमधील इराणचे राजदूत अब्दुलरेजा रेहमानी यांनी स्पष्ट केले की, अमेरिकेच्या भूतकाळातील भूमिकेमुळे इराण सावध आहे. जर अमेरिका पुन्हा करार मोडला, तर इराण कठोर प्रत्युत्तर देईल, असा इशारा त्यांनी दिला.

चीन-रशियाकडून सुरक्षा हमीची मागणी

इराणने चीन आणि रशिया यांना ‘विश्वासार्ह मित्र’ म्हणत या युद्धविरामासाठी सुरक्षा हमी देण्याची विनंती केली आहे. तसेच संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद, पाकिस्तान आणि तुर्कीये यांनीही मध्यस्थी करत शांततेची हमी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

ट्रम्प यांची भूमिका

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन आठवड्यांसाठी इराणवरील हल्ले थांबवण्याची घोषणा केली आहे, जेणेकरून शांतता चर्चेला संधी मिळू शकेल. त्यांनी चीनच्या भूमिकेचेही कौतुक करत इराणला चर्चेच्या टेबलावर आणण्यात चीनचा मोठा वाटा असल्याचे म्हटले. मात्र, हा युद्धविराम किती दिवस चालेल, याबाबत संशय कायम आहे.

होर्मुझमध्ये हजारो जहाजे प्रतीक्षेत

स्ट्रेट ऑफ होर्मु्झ परिसरात सध्या सुमारे ३,००० जहाजे मार्ग खुला होण्याची वाट पाहत आहेत. इराणने तणाव कमी करण्यासाठी काही पावले उचलण्याचे संकेत दिले असले, तरी परिसर पूर्णपणे कधी खुली होईल हे चर्चेच्या निकालावर अवलंबून असल्याचे सांगितले. युद्धविरामाबाबत पुढील चर्चा पाकिस्तानात होणार असून, इराणचे परराष्ट्र मंत्रालय त्याचे नेतृत्व करणार आहे.

Web Title : ईरान को अमेरिका पर भरोसा नहीं, रूस-चीन दें सुरक्षा गारंटी: बड़ी मांग

Web Summary : ईरान को अमेरिका पर भरोसा नहीं है, उसने रूस और चीन से सुरक्षा गारंटी मांगी है। अमेरिका और इजराइल के साथ नाजुक युद्धविराम के बीच ईरान को सुरक्षा का डर है। ईरान ने संयुक्त राष्ट्र, पाकिस्तान और तुर्की से मध्यस्थता का आग्रह किया है। होर्मुज में हजारों जहाज मार्ग खुलने का इंतजार कर रहे हैं।

Web Title : Iran distrusts US, seeks Russia-China security guarantee amid ceasefire.

Web Summary : Iran seeks security guarantees from Russia and China, distrusting the US amidst a fragile ceasefire with America and Israel. Iran requests mediation from UN, Pakistan and Turkey. Discussions are expected in Pakistan. Thousands of ships await passage through Hormuz.