शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

तडजोड कधीच नाही! इराणनं अमेरिकेचा दावा फेटाळला, डोनाल्ड ट्रम्प यांचीही उडवली खिल्ली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 13:24 IST

America Israel Iran War: इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव आता एका नव्या वळणावर आला आहे.

अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव आता एका नव्या वळणावर आला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत सकारात्मक चर्चा झाल्याचा दावा केल्यानंतर, इराणच्या लष्कराने या दाव्याची खिल्ली उडवली आहे. अमेरिकन लोक सध्या केवळ स्वतःशीच चर्चा करत आहेत, असा टोला इराणने लगावला आहे.

अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले होते की, "आमची इराणसोबत दोन दिवस सकारात्मक चर्चा झाली आहे, त्यामुळे आम्ही पुढील पाच दिवस इराणवर हल्ला करणार नाही." मात्र, इराणने अशा प्रकारची कोणतीही चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट केले आणि अमेरिकेने केलेला दावा फेटाळून लावला आहे. 

हे देखील वाचा"भारताची भूमिका महत्त्वाची..., इराणसोबत युद्ध थांबवायचं असेल तर..."; इस्रायलने इराणसमोर ठेवल्या ४ मोठ्या अटी!

इराणने अमेरिकेचा दावा फेटाळला

इराणच्या लष्कराच्या 'खतम अल-अंबिया' केंद्रीय मुख्यालयाचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल इब्राहिम झोल्फघारी यांनी अमेरिकेला आरसा दाखवत कडक शब्दांत टीका केली आहे. एका ताज्या व्हिडिओ संदेशात त्यांनी अमेरिकेच्या सत्तेचा काळ संपत असल्याचे संकेत दिले. ज्या अमेरिकेला जग 'महासत्ता' म्हणून ओळखत असे, त्या सत्तेचे आता मोठ्या अपयशात रूपांतर झाले आहे. अमेरिका आजही स्वतःला जगाचा केंद्रबिंदू आणि एकमेव महासत्ता समजते, पण हे केवळ त्यांचे भ्रम आहेत. अमेरिकेने या मानसिकतेतून लवकरात लवकर बाहेर पडणे गरजेचे आहे. झोल्फघारी पुढे म्हणाले की, "आमचे पहिले आणि शेवटचे शब्द सुरुवातीपासून एकच आहेत आणि तेच राहतील: आमच्यासारखे लोक तुमच्यासारख्या लोकांशी कधीही तडजोड करणार नाहीत."

हे देखील वाचा: इराणचा मास्टरस्ट्रोक! जगात अमेरिकेला एकाकी पाडायची रणनीती? ट्रम्प यांच्या दाव्यावर फेरले पाणी

डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले होते?

सोमवारी एका निवेदनात डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते की, गेल्या दोन दिवसांपासून इराण आणि अमेरिका यांच्यात चर्चा सुरू आहे. या चर्चेच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकन लष्कराला पुढील पाच दिवस इराणच्या ऊर्जा केंद्रांवर किंवा ऊर्जा प्रकल्पांवर कोणताही हल्ला न करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जर ही चर्चा सकारात्मक झाली, तर भविष्यात दोन्ही देशांमधील युद्धजन्य परिस्थिती संपुष्टात येऊ शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. परंतु, इराणने अमेरिकेसोबत कोणतीही सकारात्मक किंवा अधिकृत चर्चा सुरू नसल्याचे म्हटले आहे. एवढेच नव्हे तर, इराणने स्पष्ट शब्दात बजावले आहे की, ते अमेरिकेसोबत कोणत्याही प्रकारची तडजोड करणार नाहीत.

युद्धाची सद्यस्थिती

ट्रम्प यांच्या विधानामुळे जागतिक बाजारात आणि राजनैतिक स्तरावर युद्ध थांबण्याची आशा निर्माण झाली होती. मात्र, इराणच्या नकारामुळे हे संकट पुन्हा गडद झाले आहे. ऊर्जा प्रकल्पांवरील हल्ले थांबवण्याचा अमेरिकेचा निर्णय हा केवळ एकतर्फी पवित्रा ठरतो की इराणला चर्चेच्या टेबलावर आणण्यासाठी केलेली रणनीती, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरेल.

English
हिंदी सारांश
Web Title : No compromise! Iran rejects US claims, mocks Donald Trump.

Web Summary : Iran refuted US claims of positive talks, dismissing Trump's statement about halting attacks. Iran insists it will never compromise with America, signaling escalating tensions.
टॅग्स :Warयुद्धAmericaअमेरिकाIranइराणIsraelइस्रायल