इराणमध्ये मागील काही दिवसांपासून खोमेनी सरकारविरुद्ध निदर्शने सुरू आहे. अनेक लोकांनी रस्त्यावर उतरुन सरकार विरोधात घोषणाबाजी सुरू केली आहे. आता यामध्ये अमेरिका उडी घेण्याच्या तयारीत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणी राजवटीला स्पष्टपणे धमकी दिली आहे. जर राजवटीने शांततापूर्ण निदर्शकांना मारले तर अमेरिका त्यांचे रक्षण करण्यास तयार आहे, असे ट्रम्प म्हणाले. इराणचे सर्वोच्च नेते अली खोमेनी यांना सत्तेवरून हटवण्यासाठी मोहीम राबवणाऱ्या या निदर्शकांना अमेरिकेचा काही प्रमाणात पाठिंबा असल्याचे मानले जाते.
पाकिस्तानच्या हाती लागला मोठा खजिना; देशाची गरिबी दूर होणार? पीएम शरीफ म्हणाले...
इराणमध्ये सत्ता बदलाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या निदर्शनांचा आज सहावा दिवस आहे. आर्थिक निदर्शनांनी आता राजकीय वळण घेतले आहे, निदर्शकांनी "हुकूमशहाला मृत्युदंड" आणि "मुल्लांनो, देश सोडून जा" अशा घोषणा दिल्या आहेत. इराणमध्ये पोलिस कारवाई आणि निदर्शकांविरुद्ध गोळीबारात काही मृत्यू झाल्याच्या बातम्या आल्या आहेत. इराणमधील परिस्थिती वेगाने बदलत आहे. इंटरनेट निर्बंध देखील लादण्यात आले आहेत. मानवाधिकार संघटनांच्या मते, इराणमध्ये निदर्शकांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात सहा जणांचा मृत्यू झाला आहे.
कुहदश्तमध्ये सुरक्षा दलांनी अमीरहेसम खोदयारीफर्द यांच्या डोक्यात गोळी झाडून त्यांची हत्या केली. फोलादशहरमध्ये दरूश अन्सारी बख्तियारिवंद यांच्यावर कलाश्निकोव्ह असॉल्ट रायफलने गोळी झाडण्यात आली. अझना आणि लॉर्डेगनमध्येही निदर्शकांचा मृत्यू झाला.
इराणच्या मारवदाश्त शहरात निदर्शनांदरम्यान सुरक्षा दलांच्या थेट गोळीबारात एका निदर्शकाचा मृत्यू झाला. खोदादाद शरीफी मोनफारेद असे या पीडितेचे नाव असून तो स्थानिक रहिवासी होता आणि गुरुवारी तलेघानी रस्त्यावर निदर्शनादरम्यान त्याला गोळी लागली.
दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला इशारा दिला. जर निदर्शकांना मारले जात राहिले तर अमेरिका त्यांच्या मदतीला येईल. ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले आहे की, "जर इराणने शांततापूर्ण निदर्शकांवर गोळीबार केला आणि त्यांच्या प्रथेप्रमाणे त्यांच्यावर हिंसाचार केला तर अमेरिका त्यांच्या मदतीला येईल."
Web Summary : Amidst Iranian protests against the government, Trump warned Iran. He stated the US is ready to protect peaceful protestors if the regime harms them. Demonstrations continue for the sixth day, facing police action and reported deaths.
Web Summary : ईरान में सरकार विरोधी प्रदर्शनों के बीच, ट्रंप ने ईरान को चेतावनी दी। उन्होंने कहा कि अगर शासन प्रदर्शनकारियों को नुकसान पहुंचाता है तो अमेरिका उनकी रक्षा के लिए तैयार है। प्रदर्शन छठे दिन भी जारी हैं, पुलिस कार्रवाई और मौतों की खबरें हैं।