टॅरिफ युद्धात अमेरिका मालामाल, रोज किती होतेय कमाई...? डोनाल्ड ट्रम्प यांनी आकडाच सांगितला, जाणून थक्क व्हाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 09:58 IST2025-04-09T09:57:41+5:302025-04-09T09:58:10+5:30

व्यापार युद्ध सुरू करणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आता त्यांच्या निर्णयाचे समर्थन करताना दिसत आहेत...

America is getting rich in the tariff war, how much is it earning every day Donald Trump revealed the figures | टॅरिफ युद्धात अमेरिका मालामाल, रोज किती होतेय कमाई...? डोनाल्ड ट्रम्प यांनी आकडाच सांगितला, जाणून थक्क व्हाल!

टॅरिफ युद्धात अमेरिका मालामाल, रोज किती होतेय कमाई...? डोनाल्ड ट्रम्प यांनी आकडाच सांगितला, जाणून थक्क व्हाल!

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ घोषणेनंतर जगभरात व्यापार युद्धाला सुरुवात झाली आहे. यानंतर आता ट्रम्प आपला निर्णय कसा योग्य आहे, हे सांगताना दिसत आहेत. आता, टॅरिफ संदर्भातील आपल्या निर्णयामुळे अमेरिकेला रोज अब्जावधी डॉलर्सची कमाई होत असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे. महत्वाचे म्हणजे, अमेरिकेने नुकतच चीनला 104 टक्क्यांचा टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे. जो मंगळवारी मध्यरात्रीपासून लागू झाला आहे.

ट्रम्प यांनी टॅरिफचा परिणाम "स्फोटक" असल्याचे म्हटले आहे. ट्रम्प यांनी मंगळवारी व्हाइट हाऊस येथे खासदार आणि मंत्र्यांसह चर्चा केली. ते म्हणाले, आपण टॅरिफ संदर्भात घेतेलेले निर्णय अमेरिकेचे उद्योग पुन्हा एकदा बळकट करण्यासाटी महत्वाचे होते. ट्रम्प यांनी आधीच 60 देशांविरुद्ध टॅरिफ वाढवला आहे. एवढेच नाही तर, "एवढा पैसा येत आहे, जो यापूर्वी कधीही पाहिला नव्हता," असेही ट्रम्प म्हणाले.

माध्यमांतील वृत्तांनुसार, टॅरिफच्या मदतीने रोज 2 बिलियन डॉलर एवढी कमाई होत असल्याचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे म्हणणे आहे. मात्र, नेमक्या कोणत्या टॅरिफमुळे महसूल एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढण्यास मदत झाली? हे त्यांनी स्पष्ट केले नाही.

चीनवर 104 टक्के टॅरिफ -
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर मंगळवारी, व्हाईट हाऊसने चीनवर तब्बल १०४% टॅरिफ लादला असून, तो मंगळवारी मध्यरात्रीपासून अर्थात ९ एप्रिलपासून लागू झाला आहे. जर चीनने अमेरिकेवर लादलेला ३४% कर मागे घेतला नाही तर चीनवर अतिरिक्त ५०% कर लादला जाईल, अशी धमकी ट्रम्प यांनी दिली होती. ती धमकी ट्रम्प यांनी खरी करून दाखविली आहे.

आम्हीही व्यापार युद्धासाठी तयार - चीन 
अमेरिका आमच्यावर लादत असलेले शुल्क आणखी वाढवण्याची धमकी देऊन एकामागून एक चुका करत आहे. जर व्यापार युद्ध झाले तर चीन पूर्णपणे तयार आहे. अमेरिकेच्या शुल्काचा परिणाम होईल, पण आकाश कोसळणार नाही, असे चीनने म्हटले आहे.
 

Web Title: America is getting rich in the tariff war, how much is it earning every day Donald Trump revealed the figures

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.