शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
2
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
3
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
4
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
5
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
6
'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
7
Navratri 2025: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
8
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
9
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
10
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
11
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
12
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
13
भारतात राहून पोस्ट ग्रॅजुएशन अन् देशालाच उडवण्याची योजना; पोलिसांनी सांगितले अटक केलेल्या ५ दहशतवाद्यांचे मनसुबे! 
14
साखरेच्या डब्यात मुंग्याच मुंग्या; पाहून डोक्याचा होतो भुगा, 'या' घरगुती उपायाने होतील छूमंतर
15
VIDEO: बापरे... मगर आणि पाणघोडा आले समोरासमोर, दोघांमध्ये तुफान जुंपली... कोण जिंकलं?
16
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
17
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
18
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
19
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!

अमेरिकेने दोस्ती निभावली! भारताच्या मदतीला धावली; चीन-पाकिस्तानचा मोठा कट उधळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2020 11:42 IST

अमेरिकेच्या सुरक्षा परिषदेने शुक्रवारी अधिकृतरित्या भारताला याबाबत कळविले आहे. भारताच्या ४ नागरिकांना आंतरराष्ट्रीय दहशतवादी ठरविण्याचा प्रस्ताव पाकिस्तानने दिला होता.

नवी दिल्ली : दहशतवादाला समर्थव देण्याच्या मुद्द्यावरून पाकिस्ताननेचीनच्या मदतीने भारताला अडकविण्याचा मोठा कट रचला होता. मात्र, हा डाव अमेरिकेने उधळून लावला आहे. जम्मू काश्मीरमध्ये सक्रीय असलेली दहशतवादी संघटना  जैश-ए-मोहम्‍मद आणि मुंबई हल्ल्यातील आरोपी मसूद अझहरला संयुक्त राष्ट्राने जागतिक दहशतवाद्यांच्या यादीत टाकल्यावर पाकिस्तानने हा कट रचला होता. 

अमेरिकेच्या सुरक्षा परिषदेने शुक्रवारी अधिकृतरित्या भारताला याबाबत कळविले आहे. भारताच्या ४ नागरिकांना आंतरराष्ट्रीय दहशतवादी ठरविण्याचा प्रस्ताव पाकिस्तानने दिला होता. त्यांच्यावर पाकिस्तानमध्ये दहशतवाद पसरविल्याचा आरोप केला होता. हा पाकिस्तानचा प्रस्ताव अमेरिका रोखणार असल्याचे कळविण्यात आले आहे. यामध्ये अफगाणिस्तानमध्ये सक्रीय असलेल्या भारतीय कन्स्ट्रक्शन कंपनीचे इंजिनिअर वेनू माधव डोंगरा यांचेही नाव होते. 

पाकिस्तानला असे वाटत होते की चीनच्या मदतीने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये वेनू माधव यांना जागतिक दहशतवादी घोषित करता येईल. मात्र, पाकिस्तानचे काळे मनसुबे उधळले गेले आहेत. अमेरिकेने गेल्या वर्षीच सप्टेंबरमध्ये हा प्रस्ताव तांत्रिकदृष्ट्या रोखला होता. तसेच पाकिस्तानला डोंगरा यांच्याविरोधात आणखी पुरावे देण्यास सांगितले होते. 

मात्र, पाकिस्तानने डोंगरा यांच्याविरोधात पुरावे सादर केले नाहीत. यामुळे अमेरिकेने हा प्रस्ताव अधिकृतरित्या रोखला आहे. यामुळे हा प्रस्ताव आता रद्द झाला आहे. जर पाकिस्तानला पुन्हा डोंगरा यांना यामध्ये अडकवायचे असेल तर पुन्हा नवा प्रस्ताव सादर करावा लागेल. पाकिस्तान डोंगरायांच्यावर कारवाई करून मसूद अझहरवरील बंदीचा बदला घेऊ इच्छित होता. मात्र, अमेरिकेमुळे तो पूर्णपणे फसला. याआधी चीनने मसूद अझहरविरोधात आलेल्या प्रस्तावांना चारवेळा विरोध करत रोखून धरले होते. मात्र, नंतर अमेरिकेने ताकद दाखवत अझहरला जागतिक दहशतवादी घोषित केले होते. 

भारतीय अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही कधीही पाकिस्तानकडून ठोस पुरावे येतील याची अपेक्षा केली नव्हती. अझहरच्या प्रकरणात चीनने पाय आडवा घातला होता. मात्र, त्याची संघटनाच संयुक्त राष्ट्रांनी दहशतवादी घोषित केल्याने चीनलाही माघार घ्यावी लागली होती. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

Maruti Suzuki ची नवीन सीएनजी कार लाँच; जाणून घ्या किंमत अन् फिचर्स

India China FaceOff: भारतद्वेष्ट्या चिनी जनरलनेच दिला हल्ल्याचा आदेश; अमेरिकी गुप्तहेरांचा दावा

'काहीतरी नवे येतेय'! चीनची कंपनी एकच धमाका करण्याच्या तयारीत; जाणून घ्या...

India China FaceOff: हाय रे दैवा! 'मेड इन चायना' बुलेटप्रूफ जॅकेट घालूनच चीनसोबत लढणार?

India China Face Off: चीनी सैनिकांची खैर नाही! भारताचे सर्वात खतरनाक पहाडी योद्धे तैनात

टॅग्स :AmericaअमेरिकाchinaचीनPakistanपाकिस्तानTerrorismदहशतवादmasood azharमसूद अजहर