शहरं
Join us  
Trending Stories
1
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
4
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
5
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
6
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
7
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
8
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
9
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
10
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
11
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
12
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
13
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
14
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
15
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
16
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
17
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
18
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
19
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
20
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस

युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 05:26 IST

अमेरिकेच्या बी-२ स्टिल्थ विमानांनी इराणचे फॉर्डो आण्विक केंद्र उद्ध्वस्त करण्यासाठी बंकर बस्टर्ड बॉम्ब टाकले. इराण म्हणतो, अमेरिकेने हद्द ओलांडली, आम्ही बदला घेऊ.

तेल अवीव : इस्रायल-इराण यांच्यात पेटलेल्या युद्धात रविवारी अमेरिकेने उडी घेतली. इराणचा आण्विक कार्यक्रम रोखण्यासाठी इस्रायलने सुरू केलेल्या हल्ल्यांदरम्यान अमेरिकेनेही रविवारी पहाटेच्या सुमारास इराणच्या तीन आण्विक केंद्रांवर बंकर बस्टर बॉम्बनी हल्ला केला. भारतीय वेळेनुसार रविवारी पहाटे ४:३० वाजता हा हल्ला झाला. या हल्ल्यांमुळे युद्धाची व्याप्ती वाढण्याची शक्यता असून जगभर यावर प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. 

अमेरिकेच्या बी-२ स्टिल्थ विमानांनी इराणचे फॉर्डो आण्विक केंद्र उद्ध्वस्त करण्यासाठी बंकर बस्टर्ड बॉम्ब टाकले. सुमारे १३,६०० किलो वजनाचा एक बॉम्ब असे १४ बॉम्ब टाकून हे केंद्र नष्ट केले. यासोबत अमेरिकेच्या पाणबुड्यांनीही ३० टोमाहॉक क्षेपणास्त्रे इराणच्या नतांझ आणि इस्फहान आण्विक केंद्राच्या दिशेने डागली. नतांझवर एक बस्टर्ड बॉम्बही टाकण्यात आला.

अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘व्हाइट हाऊस’वरून राष्ट्राला संबोधित करताना इराणच्या आण्विक केंद्रांवर हल्ला करून ती पूर्णपणे नष्ट करण्यात आली असल्याचे सांगितले.

डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर हे हल्ले केले जात असताना अमेरिकी काँग्रेसची परवानगी घेतलेली नाही. उलट इराणने अमेरिकी तळांवर कुठेही प्रत्युत्तरादाखल कारवाई केली तर आणखी हल्ले केले जातील, अशी धमकी त्यांनी दिली आहे. 

इराण व संयुक्त राष्ट्रसंघाच्या आण्विक निगराणी संस्थांनी हल्ल्यानंतर कोणत्याही प्रकारचा किरणोत्सर्ग झाला नसल्याचे म्हटले आहे. या हल्ल्यानंतर हवेत केवळ दाट धुरांचे ढग दाटले असल्याचे या संस्थांनी नमूद केले आहे.

फक्त अमेरिकेकडेच असलेल्या बी-२ स्पिरिट स्टील्थ बॉम्बरचा प्रथमच वापर झाला. त्याचा रडार क्रॉस-सेक्शन छोटा असल्याने ते रडारवर शोधणे अशक्य आहे.

इराणच्या या ठिकाणांवर हल्ले

फोर्डो : तेहरानच्या वायव्येस १२५ किमी अंतरावर डोंगरात ३०० फूट खोल बांधलेली भूमिगत युरेनियम संवर्धन सुविधा. अणु कार्यक्रमाचे मध्यवर्ती केंद्र आहे. येथे ६०% पर्यंत संवर्धित युरेनियम तयार केले जाते.

नतांझ : सर्वात मोठे युरेनियम संवर्धन केंद्र, तेहरानच्या आग्नेयेस २२० किमी अंतरावर. येथे जमिनीवरील आणि भूमिगत सुविधांमध्ये युरेनियम संवर्धन केले जाते. 

इस्फहान : अणु संशोधन आणि तंत्रज्ञान विकास केंद्र, जिथे अणु इंधन आणि इतर सामग्री तयार केली जाते. अणु कार्यक्रमाचा महत्त्वाचा भाग आहे.

तिसऱ्या महायुद्धाची सुरूवात? जगभरात भीती

साना : अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर येमेनच्या लष्कराने या युद्धात इराणला मदत करण्याची घोषणा केली. लेबनॉनने युद्धात सहभागी होण्यास नकार दिला आहे. पाकिस्तान, ओमान आणि कतार या देशांनी अमेरिकी हल्ल्यांचा तीव्र शब्दांत निषेध केला. आता पुढे काय? तिसरे महायुद्ध सुरू हाेते का? अशी भीती जगभरात पसरली आहे.

मोदी यांची इराणच्या राष्ट्रपतींशी चर्चा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी इराणचे राष्ट्रपती मसूद पेजेशकियान यांच्याशी फोनवरून चर्चा करून इराण-इस्रायल संघर्षाबाबत चिंता व्यक्त केली. परस्पर संवाद आणि राजकीय प्रयत्नांतून हा तणाव कमी करण्याचे आवाहन त्यांनी केले. 

कोणते देश कुणाच्या बाजूने, कोण तटस्थ? 

अमेरिकेला समर्थन : इंग्लंड, अर्जेंटिना

इराणला समर्थन : रशिया, चीन, पाकिस्तान, इराक, लेबनॉन, व्हेनेझुएला, कोलंबिया, चिली, हमास (पॅलेस्टिनी संघटना), हूथी बंडखोर (येमेन) तटस्थ/संयमाचे आवाहन : युरोपियन युनियन, इटली, आयर्लंड, जपान, इजिप्त, सौदी अरेबिया, कतार, मेक्सिको

अमेरिकेने असा केला हल्ला

१२५ जेट विमाने इराणच्या दिशेने झेपावली.

०७ विमाने होती बी-२ बॉम्बर जातीची

१३,६०० किलो वजनाचे १४ बस्टर बॉम्ब टाकले

१२ किमीवरून (७.५ मैल) बी-२ स्टिल्थ विमानातून सोडला जातो.

जीबीयू-५७ - हा एक प्रचंड वजनाचे (१३.६ टन) बंकर-भेदी बॉम्ब आहे.

बॉम्ब अतिशय उंचावरून सोडल्याने आणि इंजिन नसल्याने तो पडताना अतिशय वेगाने खाली येतो.

उपग्रह मार्गदर्शनामुळे तो ॲडजेस्टेबल टेल फिन्सच्या मदतीने दिशा बदलू शकतो.

बॉम्बच्या प्रचंड वजनामुळे आघात झाल्यावर मोठ्या प्रमाणात गतिज ऊर्जा निर्माण होते.

इराणची प्रमुख अणु संवर्धन केंद्र पूर्णपणे नष्ट झाली आहेत. आता शांतता प्रस्थापित होईल किंवा त्यांच्यासाठी हे युद्ध शोकांतिका ठरेल. -डोनाल्ड ट्रम्प, राष्ट्राध्यक्ष, अमेरिका

राजकीय चर्चेतून मार्ग काढण्याची वेळ गेली. अमेरिकेचा हा उन्माद भयंकर परिणामांसाठी जबाबदार असेल. अमेरिकेने मर्यादा ओलांडल्या. -अब्बास अरागची, परराष्ट्रमंत्री, इराण

आण्विक केंद्रांवर अमेरिकेने केलेले हल्ले या भागाचा इतिहास बदलू टाकतील. इतिहासात नोंद होईल की ट्रम्प यांनी धोकादायक शस्त्रांना नाकारले. - बेंझामिन नेतान्याहू, पीएम, इस्रायल

टॅग्स :IranइराणAmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पwarयुद्धUSअमेरिकाIsraelइस्रायल