शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
3
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
4
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
5
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
6
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
7
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
8
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
9
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
10
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
11
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
12
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
13
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
14
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
15
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
16
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
17
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
18
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
19
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
20
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!

“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 23:03 IST

America Entry in Israel Iran War: अमेरिकेने केलेल्या हल्ल्याला इराणने जोरदार प्रत्युत्तर दिले असून, कतार येथील अमेरिकेच्या लष्करी तळांवर अनेक क्षेपणास्त्रे डागली असल्याचे वृत्त आहे.

America Entry in Israel Iran War:इस्रायल-इराण यांच्यात पेटलेल्या युद्धात अमेरिकेने उडी घेतली. इराणचा आण्विक कार्यक्रम रोखण्यासाठी इस्रायलने सुरू केलेल्या हल्ल्यांदरम्यान अमेरिकेने इराणच्या तीन आण्विक केंद्रांवर बंकर बस्टर बॉम्बनी हल्ला केला. या हल्ल्यांमुळे युद्धाची व्याप्ती वाढण्याची शक्यता असून जगभर यावर प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. अमेरिकेच्या बी-२ स्टिल्थ विमानांनी इराणचे फॉडों आण्विक केंद्र उद्ध्वस्त करण्यासाठी बंकर बस्टर्ड बॉम्ब टाकले. सुमारे १३ हजार ६०० किलो वजनाचा एक बॉम्ब असे १४ बॉम्ब टाकून हे केंद्र नष्ट केले. यासोबत अमेरिकेच्या पाणबुड्यांनीही ३० टोमाहॉक क्षेपणास्त्रे इराणच्या नतांझ आणि इस्फहान आण्विक केंद्राच्या दिशेने डागली. नतांझवर एक बस्टर्ड बॉम्बही टाकण्यात आला. यानंतर आता इराणने कतार येथील अमेरिकेच्या तळांवर ६ क्षेपणास्त्रे डागून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, इराणने कतारमधील अमेरिकेच्या तळांवर ६ क्षेपणास्त्रे डागली आहेत. एका इस्रायली अधिकाऱ्याचा हवाला देण्यात आला आहे. एका रिपोर्टमध्ये सदर दावा करण्यात आला आहे. या हल्ल्याकडे इराणने अमेरिकेविरुद्ध घेतलेला प्रत्युत्तर म्हणून पाहिले जात आहे. इराणच्या अणुतळांवर अमेरिकेने केलेल्या हल्ल्यांनंतर इराण आणि अमेरिकेतील तणाव सतत वाढत आहे. 

स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार

रशियाचे उप परराष्ट्र मंत्री रियाबकोव्ह यांनी सांगितले की, इराणला स्वसंरक्षणाचा पूर्ण अधिकार आहे. मॉस्को आणि तेहरानमधील धोरणात्मक भागीदारी अतूट असल्याचे म्हटले आहे. इराणने रशियाकडून लष्करी मदत मागितली आहे का, असे विचारले असता, रियाबकोव्ह यांनी इंटरफॅक्सला सांगितले की दोन्ही देश अनेक क्षेत्रात सहकार्य करत आहेत, अधिक तपशील देणे बेजबाबदारपणाचे ठरेल. दुसरीकडे, इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरागची हे रशिया दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते व्लादिमीर पुतिन यांची भेट घेणार आहेत. या भेटी दरम्यान अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. मंत्री अब्बास अराघची यांच्याकडे इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांनी पत्र देत पुतिन यांच्याकडे पाठिंबा मागितल्याचे वृत्त आहे.

दरम्यान,  वॉल स्ट्रीट जर्नलच्या वृत्तानुसार, इराणने या प्रदेशातील अमेरिकन लष्करी दलांवर संभाव्य हल्ल्याच्या तयारीसाठी क्षेपणास्त्र लाँचर्स तैनात केल्याचे वृत्त आहे. इराणच्या या प्रतिहल्ल्यामुळे आखाती देशांमध्ये तणाव वाढला आहे. कतार येथील अमेरिकेचा तळ मध्य पूर्वेतील अमेरिकन लष्करी कारवायांसाठी एक प्रमुख केंद्र म्हणून काम करतो, अशी माहिती देण्यात आली आहे. इराणने प्रत्युत्तरादाखल डागलेल्या क्षेपणास्त्रांचे आवाज कतारची राजधानी दोहा येथे ऐकू आले, असे प्रत्यक्षदर्शींनी रॉयटर्सला सांगितले. तसेच या भागातील परिस्थिती अजूनही स्थिर आहे. प्रादेशिक आणि जागतिक सुरक्षा निरीक्षक इराणच्या लष्करी भूमिकेवर आणि आखातातील अमेरिकेच्या मालमत्तेवर होणाऱ्या परिणामांवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे म्हटले जात आहे.

 

टॅग्स :russiaरशियाIranइराणIsraelइस्रायलAmericaअमेरिका