अमेरिकेत पुन्हा कोरोनाचा उद्रेक! 15 राज्यांत आरोग्य यंत्रणेवर ताण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2021 08:48 AM2021-11-23T08:48:29+5:302021-11-23T08:49:26+5:30

Coronavirus in America : अमेरिकेतील डिपार्टमेंट ऑफ हेल्थ अँड ह्युमन सर्व्हिसेसच्या आकडेवारीनुसार, देशाच्या अनेक भागांमध्ये कोरोनाची प्रकरणे गेल्या वर्षीच्या नोव्हेंबरप्रमाणेच वाढत आहेत.

America Coronavirus Cases on the Rise as Thanksgiving Holiday Approaches | अमेरिकेत पुन्हा कोरोनाचा उद्रेक! 15 राज्यांत आरोग्य यंत्रणेवर ताण

अमेरिकेत पुन्हा कोरोनाचा उद्रेक! 15 राज्यांत आरोग्य यंत्रणेवर ताण

googlenewsNext

वॉशिंग्टन : अमेरिकेत (America) कोरोना व्हायरसचा (Coronavirus In America) प्रादुर्भाव पुन्हा दिसून येत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी लस उपलब्ध झाल्यानंतरही पुन्हा एकदा येथील रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. अमेरिकेतील डिपार्टमेंट ऑफ हेल्थ अँड ह्युमन सर्व्हिसेसच्या आकडेवारीनुसार, देशाच्या अनेक भागांमध्ये कोरोनाची प्रकरणे गेल्या वर्षीच्या नोव्हेंबरप्रमाणेच वाढत आहेत.

ब्लूमबर्ग या वृत्तसंस्थेने रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, कोरोना संसर्ग झालेले किंवा संशयित रुग्णांना 15 राज्यांमध्ये एक वर्षापूर्वीच्या तुलनेत जास्त आयसीयू (ICU) बेडची आवश्यकता आहे. कोलोरॅडो, मिनेसोटा आणि मिशिगनमध्ये आतापर्यंत आयसीयूमध्ये दाखल झालेल्या रुग्णांची संख्या अनुक्रमे 41, 37 आणि 34 टक्के आहे.

मिशिगनमध्ये प्रति व्यक्ती सर्वाधिक प्रकरणे समोर येत आहेत. मात्र, राज्यात अद्याप कोणतेही निर्बंध जारी करण्यात आलेले नाहीत. राज्यातील प्रशासकीय विभाग प्रत्येकाला मास्क घालण्यासाठी आणि लसीकरण करण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत. युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टन इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्युएशनचे प्राध्यापक अली मोकदाद म्हणाले, "आमचे बरेच डॉक्टर सतत रुग्णालयात असतात. आयसीयू, इमर्जन्सी आणि रुग्णालयात राहून अशा व्यक्तीचा मृत्यू होताना पाहणे सोपे नाही, ज्याचे अद्याप लसीकरण झाले नाही."

इतर रुग्णांना मिळत नाहीत बेड
कोरोना रुग्णांसाठी आयसीयू बेड्सची गरज असल्याने इतर आजारांनी त्रस्त रुग्णांना बेड मिळत नाहीत. जे त्यांच्यासाठी अधिक धोकादायक आहे. दोन महिन्यांपासून कोरोना संसर्गाची प्रकरणे कमी झाल्यानंतर पुन्हा एकदा वाढ नोंदवली जात आहे. डेल्टा व्हेरिएंटमुळे ही कोरोनाची प्रकरणे वाढत असल्याचे समोर येत आहे. थंडीमुळे लोक घरात असल्याचे सांगण्यात येत आहे. 

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, लसींपासून संरक्षण कमी होत आहे, त्यामुळे या हिवाळ्यात कोरोना महामारीच्या आणखी एका मोठ्या लाटेचा सामना करावा लागू शकतो. दुसरीकडे, कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमध्ये, अमेरिकन आरोग्य संस्था पुन्हा एकदा लोकांना लस संरक्षण देऊ इच्छित आहेत. अशा परिस्थितीत अमेरिकेच्या आरोग्य संस्थांनी अँटी-कोरोना लसींचा बूस्टर डोस देण्यासाठी परवानगी दिली आहे.

Web Title: America Coronavirus Cases on the Rise as Thanksgiving Holiday Approaches

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.