शहरं
Join us  
Trending Stories
1
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
2
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
3
श्रेयस अय्यरला झालेली दुखापत किती गंभीर, आता कशी आहे प्रकृती? बीसीसीआयने दिली महत्त्वाची माहिती
4
युक्रेनचा रशियावर मोठा ड्रोन हल्ला! १९३ ड्रोनमधून गोळीबार, मॉस्कोतील दोन विमानतळ बंद
5
'वॉशिंग्टन पोस्ट'चा अहवाल LIC ने फेटाळला; अदानी समूहात फक्त ४% गुंतवणूक, मग सर्वाधिक पैसा कुठे?
6
Mid-Size SUV: २० लाखांपेक्षा कमी बजेटमध्ये घरी आणा 'या' ५ जबरदस्त मिड- साइज एसयूव्ही कार!
7
Video: घरात अन् महाराष्ट्रात जिथं असाल तिथे मराठीत बोला, नाहीतर...; अजित पवारांचं आवाहन
8
डॉक्टर महिलेच्या हातावरील हस्ताक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ
9
८ वर्षाचं नातं क्षणातच विसरली, पत्नीनं केलेल्या कांडामुळे पती झाला शॉक; चिठ्ठी लिहिली अन्...
10
MCX वर आपटले होते, पण सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर वाढले, खरेदी करणार असाल तर पाहा लेटेस्ट रेट
11
Mumbai Crime: "शेवटचे दिवस जवळ आलेत", भावेश शिंदे घरातून बाहेर पडला आणि मुंबई लोकलखाली संपवले आयुष्य
12
Desi Jugaad: तरुणांची चपाती फुगवण्याची सीक्रेट ट्रिक व्हायरल; व्हिडीओ पाहून महिलांची उडेल झोप!
13
निष्काळजीपणाचा कळस! रुग्णालयात महिलेला लावलं एक्सपायर्ड ग्लुकोज, तोंडातून फेस आला अन्...
14
बिहार निवडणुकीच्या रणधुमाळीतच भाजपची मोठी कारवाई, चार नेत्यांची पक्षातून हकालपट्टी; करण्यात आले गंभीर आरोप
15
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
16
“महायुतीचे शेतकरी पॅकेज थोतांड, कर्जमाफी करावी; राज्य दिवाळखोरीत काढले”: हर्षवर्धन सपकाळ
17
EPF खातेधारकांना मोठी भेट! 'फ्री'मध्ये मिळतोय ₹७ लाखांपर्यंतचा जीवन विमा; कुटुंबाला मिळेल मोठा आधार
18
२० वर्षीय भारतीय तरुणीवर ब्रिटनमध्ये बलात्कार, आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद; वर्णद्वेषातून कृत्य
19
भारताच्या 'या' राज्यांवर बांगलादेशची नजर; युनूस यांनी पाकिस्तानला सोपवला वादग्रस्त नकाशा

ओमायक्रॉनचा नवीन म्यूटेंट BA.2.12.1 मुळे कहर! अमेरिकेतील 13 राज्यात संक्रमण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2022 20:32 IST

Omicron : आकडेवारीनुसार, ओमायक्रॉनचा नवीन म्यूटेंट BA.2.12.1 राष्ट्रीय स्तरावर गेल्या आठवड्यात कोरोना संसर्गासाठी जबाबदार असल्याचे सांगण्यात आले आहे.

न्यूयॉर्क: कोरोनाचे (Corona) सर्वात मोठे संसर्गजन्य व्हेरिएंट असलेल्या ओमायक्रॉनच्या (Omicron variant) नवीन म्यूटेंटने जगभरातील शास्त्रज्ञांना चिंतेत टाकले आहे. न्यूयॉर्क (New York) परिसरातील 56 टक्के रुग्णांमध्ये हा नवीन म्यूटेंट आढळून आला आहे. हा कोरोनाचा पहिला व्हेरिएंट ओमायक्रॉनपासून तयार झाला आहे. परंतु अमेरिकन शास्त्रज्ञांनी या म्यूटेंटला सर्वात वेगाने पसरणारे संक्रमण म्हटले आहे. 

यूएस सेंटर फॉर डिजीज कंट्रोल एंड प्रिव्हेंशनद्वारे मंगळवारी रिपोर्ट केलेल्या आकडेवारीनुसार, ओमायक्रॉनचा नवीन म्यूटेंट BA.2.12.1 राष्ट्रीय स्तरावर गेल्या आठवड्यात कोरोना संसर्गासाठी जबाबदार असल्याचे सांगण्यात आले आहे. ओमायक्रॉनचा नवीन म्यूटेंट BA.2.12.1 चा संसर्ग आतापर्यंत इतर 13 देशांमध्ये पोहोचला आहे. हा आधीच्या अतिसंसर्गजन्य 'स्टेल्थ ओमायक्रॉन'चा वंशज आहे. अमेरिकेतील अनेक राज्यांमध्ये या म्यूटेंटने फार कमी वेळात आपले स्थान निर्माण केले आहे. या व्हेरिएंटची बहुतांश प्रकरणे अमेरिकेतच आढळून आली आहेत, असे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. 

याचबरोबर,  BA.2.12.1 च्या वाढत्या पातळीसह प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. जसे की सेंट्रल न्यूयॉर्क, असे न्यूयॉर्क स्टेट डिपार्टमेंट ऑफ हेल्थचे एली रोसेनबर्ग यांचे मत आहे.  दरम्यान, जगात पुन्हा एकदा कोरोना व्हायरस वेगाने पसरत आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, जगातील सर्वाधिक 82 गरीब देशांमध्ये फक्त 70 टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट काही देशांमध्ये पूर्ण झाले आहे. तर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या आकडेवारीनुसार, अनेक देश 20 टक्क्यांच्या खाली आहेत. याउलट, जगातील दोन तृतीयांश श्रीमंत देशांमध्ये 70 टक्के लस (अमेरिकेत 66 टक्के) लसीकरण झाले आहे.

अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस  (Kamala Harris) यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. व्हाईट हाऊसने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, कमला हॅरिस यांचाचा कोरोना रिपोर्ट मंगळवारी पॉझिटिव्ह आला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि फर्स्ट लेडी जिल बायडन गेल्या काही दिवसांपासून कमला हॅरिसच्या संपर्कात आलेले नाहीत, असे व्हाईट हाऊसने एक निवेदन जारी केले आहे. 

वर्ल्डोमीटरच्या अहवालानुसार, गेल्या 24 तासांत फ्रान्समध्ये 58,000 आणि अमेरिकेत 12,000 प्रकरणे आढळून आली आहेत. दक्षिण कोरियामध्ये सर्वाधिक 64,725 नवीन रुग्ण आढळले आहेत. मृतांच्या संख्येबद्दल बोलायचे झाले तर फ्रान्समध्ये 40 आणि अमेरिकेत 14 जणांचा मृत्यू झाला आहे.

टॅग्स :Omicron Variantओमायक्रॉनcorona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिका