कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी बूस्टर डोस आवश्यक; अमेरिकेतील सर्वात मोठ्या तज्ज्ञाचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2021 06:54 AM2021-09-20T06:54:23+5:302021-09-20T06:55:08+5:30

याला अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडेन यांच्या प्रशासनाचेही समर्थन होते. मात्र, पॅनलने 65 आणि त्याहून अधिक वय असलेल्या लोकांसाठी फायझरच्या कोरोना लसीच्या बूस्टर डोसला मंजुरी दिली आहे.

America booster shots of corona vaccines become necessary for people to gain maximum protection against corona virus asys dr anthony fauci | कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी बूस्टर डोस आवश्यक; अमेरिकेतील सर्वात मोठ्या तज्ज्ञाचा दावा

कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी बूस्टर डोस आवश्यक; अमेरिकेतील सर्वात मोठ्या तज्ज्ञाचा दावा

Next


कोरोना महामारीविरोधात अधिकाधिक सुरक्षितता मिळविण्यासाठी कोरोना लसीचा बूस्टर डोस लोकांसाठी लवकरच आवश्यक होईल, असा दावा अमेरिकेचे वरिष्ठ संसर्गजन्य रोग तज्ज्ञ डॉ.अँथनी फौसी यांनी केला आहे. अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए) पॅनलने 16 आणि त्यापेक्षा अधिक वय असलेल्या लोकांमध्ये तिसऱ्या डोसचा व्यापक वापर नाकारल्यानंतर रविवारी ते म्हणाले, फायझरने युनायटेड स्टेट्स एफडीएला 52 पानांच्या सादरीकरणात प्रस्ताव दिला आहे. यात नुकत्याच इस्रायलने केलेल्या अभ्यासाच्या डेटाचाही समावेश होता. यात इंजेक्शननंतर, कोरोना लसीचा बूस्टर डोस 60 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांना संसर्ग आणि गंभीर आजार होण्यापासून रोखू शकतो, असे दर्शविण्यात आले होते. (America booster shots of corona vaccines become necessary for people to gain maximum protection against corona virus asys dr anthony fauci)

कोविशील्ड घेतलेल्यांसाठी आनंदाची बातमी...! माकडांवर केलेल्या प्रयोगातून समोर आली खास माहिती

याला अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडेन यांच्या प्रशासनाचेही समर्थन होते. मात्र, पॅनलने 65 आणि त्याहून अधिक वय असलेल्या लोकांसाठी फायझरच्या कोरोना लसीच्या बूस्टर डोसला मंजुरी दिली आहे.  नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ अॅलर्जी अँड इंफेक्शियस डिसीजचे संचालक अँथनी फौसी टेलीग्राफसोबत बोलताना म्हणाले, "माझ्या मते असे निदर्शनास आले आहे, की योग्य आहार, किमान एक mRNA लस, जसे फायझरसाठी दो मुख्य डोस आहेत. प्राइम, तीन ते चार आठवड्यात एक बूस्टर डोस आणि काही महिन्यांनंतर तीसरा डोस दिला जातो."

'कोरोना लस घ्याची नाही, नाही तर ब्रेकअप करीन'; तरुणाची गर्लफ्रेंडला धमकी!

अँथनी फौसी म्हणाले, "मी इम्युनिटी कमी असल्यास बूस्टर देण्याचे समर्थन करतो. जसे की आपण अमेरिकेच्या आकडेवारीत स्पष्टपणे पाहत आहोत आणि इस्रायली सहकाऱ्यांचाही डेटा आहे."
 

Read in English

Web Title: America booster shots of corona vaccines become necessary for people to gain maximum protection against corona virus asys dr anthony fauci

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.