शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2025 12:42 IST

America Attacks Iran: आज पहाटे अमेरिकेने इराणमध्ये घुसून तीन अणु प्रकल्पांवर हल्ला केला.

America Attacks Iran: गेल्या अनेक दिवसांपासून इराण आणि इस्रायलमधील संघर्ष शिगेला पोहाचला आहे. यातच, आज(दि. २२) पहाटे नको ते घडले. अमेरिकेने या युद्धात उडी घेत इराणच्या तीन अणुस्थळांवर हल्ला केला. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर आता इराणने इस्रायलवर क्षेपणास्त्रे डागली आहेत. 

इस्रायलच्या सरकारी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, इराणनकडून इस्रायलवर किमान ३० क्षेपणास्त्रे डागण्यात आली आहेत. इराणने केलेल्या या हल्ल्याचा आवाज तेल अवीव, हैफा आणि जेरुसलेमपर्यंत ऐकू आला. या हल्ल्यामुळे इस्रायली नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर इस्रायलच्या अनेक भागात सतर्कतेचा इशारा दिला आहे. 

अमेरिकेच्या हल्ल्यांनंतर इराण आक्रमक झाला असून, इस्रायलवर आणखी हल्ले करू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळेच अधिकाऱ्यांनी इस्रायली जनतेला सरकारने दिलेल्या सर्व नियामांचे पालन करण्याच्या सूचना केल्या आहेत. नागरिकांना बंकर किंवा संरक्षित भागात जाण्यास आणि पुढील सूचना मिळेपर्यंत तिथेच राहण्यास सांगण्यात आले आहे. दरम्यान, इराणच्या कुठल्याही प्रकारच्या हल्ल्यांना परतून लावण्यासाठी इस्रायली सैन्य सज्ज झाले आहे. 

अमेरिकेचा इरामवर हल्लाआज पहाटे अमेरिकेच्या लढाऊ विमानांनी इराणमधील फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान या अणुऊर्जा प्रकल्पांवर हल्ला केला आणि त्यांना नष्ट केले, अशी माहिती राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली. तर, अमेरिकेच्या हल्ल्यात कोणतेही नुकसान झालेले नसल्याचे इराणने म्हटले आहे. या हल्ल्यांनंतर नागरिकांसाठीही कोणता धोका नसल्याचे इराणच्या सरकारी माध्यमांनी म्हटले आहे. 

 

 

टॅग्स :IranइराणIsraelइस्रायलAmericaअमेरिकाwarयुद्ध