America announced visa restrictions to China officials over restricting foreigners’ access to Tibet | ...म्हणून चिनी अधिकाऱ्यांच्या अमेरिकन व्हिसावर निर्बंध; अमेरिकेचा चीनला मोठा झटका

...म्हणून चिनी अधिकाऱ्यांच्या अमेरिकन व्हिसावर निर्बंध; अमेरिकेचा चीनला मोठा झटका

ठळक मुद्देरिसिप्रोकल एक्सेस टू तिबेट कायद्यातंर्गत चिनी अधिकाऱ्यांच्या समुहाला व्हिसा प्रतिबंधअमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पोम्पिओ यांची घोषणा अमेरिकन मुत्सद्दी व इतर अधिकारी, पत्रकार व पर्यटकांच्या तिबेट भेटीस चीन व्यत्यय आणत होतं

वॉश्गिंटन – जगावर कोरोनाचं संकट निर्माण झाल्यानंतर त्याचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला, त्यामुळे अमेरिकेने कोरोनाचा फैलाव करण्यासाठी चीनला जबाबदार धरलं. अमेरिका आणि चीन यांच्यातील संबंध ताणले गेले. त्यानंतर भारत आणि चीन यांच्यातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने ठामपणे भारताच्या पाठिशी असल्याचा जाहीर केले.

दक्षिण चीन सागरात अमेरिकेच्या युद्धनौका अभ्यास सराव करुन चीनला लष्करी ताकद दाखवत आहे. चीनच्या अधिकृत माध्यम ग्लोबल टाइम्समधून अमेरिकेला धमकावण्याचा प्रयत्न झाला पण अमेरिकेने या धमकीला खिल्ली उडवत चीनला आव्हान दिलं. यानंतर आता अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पोम्पिओ यांनी रिसिप्रोकल एक्सेस टू तिबेट कायद्यातंर्गत चिनी अधिकाऱ्यांच्या समुहाला व्हिसा प्रतिबंध केला आहे. पोम्पिओ यांनी मंगळवारी ट्विट करुन ही माहिती दिली.

पोम्पिओ यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे की, आज आम्ही पीपुल्स रिपब्लिक ऑफ चायनाच्या अधिकाऱ्यांसाठी अधिकृतपणे व्हिसावर बंदी आणत आहोत, हे अधिकारी तिबेटमध्ये परदेशी लोकांच्या आणण्यात सहभागी होते. चीन अमेरिकन मुत्सद्दी व इतर अधिकारी, पत्रकार व पर्यटक यांना तिबेटी स्वायत्त प्रदेश (टीएआर) आणि इतर तिबेट प्रदेशांच्या भेटीस सातत्याने व्यत्यय आणत आहे. मात्र चिनी अधिकारी व इतर नागरिकांना अमेरिकेत येण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिलं होतं असं त्यांनी सांगितले.

तसेच चिनी सरकार आणि चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या अधिकाऱ्यांच्या व्हिसावरील निर्बंध अमेरिका जाहीर करीत आहेत, जे तिबेटी प्रांतातील परदेशी लोकांच्या प्रवेशासंदर्भात धोरण तयार करण्यास किंवा अंमलात आणण्यात मोठ्या प्रमाणात सहभागी होते. स्थानिक स्थिरतेसाठी तिबेटी भागापर्यंत पोहोचणे फार महत्वाचे आहे, कारण तेथे चिनी मानवी हक्कांचे उल्लंघन होत आहे. त्याचवेळी चीन देखील आशियाच्या प्रमुख नद्यांच्या मुख्य नद्यांजवळील पर्यावरणाचा र्‍हास रोखण्यात अपयशी ठरला आहे असं पोम्पिओ यांनी सांगितले.

दरम्यान, स्थानिक आर्थिक विकास, पर्यावरण संरक्षण आणि चीनमधील तसेच परदेशात तिबेटियन लोकांच्या मानवी परिस्थितीसाठी अमेरिका काम करत राहील. आम्ही तिबेटी लोकांच्या अर्थपूर्ण स्वायत्ततेला, त्यांच्या मूलभूत आणि अकल्पनीय मानवी हक्कांचा आदर करण्यासाठी आणि त्यांच्या अनोख्या धार्मिक, सांस्कृतिक आणि भाषिक अस्मितेचे संरक्षण करण्यासही वचनबद्ध आहोत. आम्ही अमेरिकन कॉंग्रेसबरोबर घनिष्टपणे काम करू आणि अमेरिकन नागरिकांना टी.ए.आर. आणि अन्य तिबेट प्रदेशांसह पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना सर्व भागात पूर्ण प्रवेश मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करू असंही माइक पोम्पिओ यांनी स्पष्ट केले.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: America announced visa restrictions to China officials over restricting foreigners’ access to Tibet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.