शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारच्या 'या' निर्णयामुळे चीनला झोंबली मिर्ची; ...तर अमेरिका अन् रशियाही कामी येणार नाही, भारताला दिली धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2020 23:35 IST

चीन सरकारचे मुखपत्र ग्लोबल टाइम्सने फुशारकी मारत धमकी दिली आहे, की 1962च्या युद्धावेळी अमेरिका आणि रशिया भारताच्या बाजूने आले. मात्र, चीनने कुणाचीही परवा न करता भारताला दूरपर्यंत ढकलले.

ठळक मुद्देचीन सरकारचे मुखपत्र ग्लोबल टाइम्सने 1962च्या युद्धाच्या फुशारक्या मारत धमकी देत आहे.भारताने गोळी चालवली, तर परिणाम भोगावे लागतील.जर भारताने एकतर्फी सीमा व्यवस्थापन तंत्राचे उल्लंघण केले, तर चीनलाही चोख उत्तर द्यावे लागेल.

पेइचिंग : लडाखमध्ये 15 जूनला झालेल्या हिंसक झटापटीपासून दोन्ही देशांतील तणाव शिगेला पोहोचला आहे. भारत सरकारने सीमेवर तैनात असलेल्या सैन्य अधिकाऱ्यांना परिस्थितीनुसार दोन्ही देशांतील करारात बदल करण्याची पूर्ण सूट दिली आहे. याचा अर्थ, परिस्थिती नियंत्रणात आण्यासाठी गोळी चालवणे आवश्यकच आहे, असे अधिकाऱ्यांना वाटले, तर ते क्षणाचाही विलंब न करता जवानांना तसा आदेश देऊ शकतात. मोदी सरकारच्या या निर्णयामुळेच चीनला मिर्ची झोंबली आहे.

फायर पावरच्या बाबतीत इंडियन एअरफोर्स ड्रॅगनला भारी; चीनच्या कोणत्याही कोपऱ्यात करू शकते हल्ला!

चीन मारतो 1962च्या युद्धाच्या फुशारक्या - चीन सरकारचे मुखपत्र ग्लोबल टाइम्सने फुशारकी मारत धमकी दिली आहे, की 1962च्या युद्धावेळी अमेरिका आणि रशिया भारताच्या बाजूने आले. मात्र, चीनने कुणाचीही परवा न करता भारताला दूरपर्यंत ढकलले. जर भारताने एकतर्फी सीमा व्यवस्थापन तंत्राचे उल्लंघण केले, तर चीनलाही चोख उत्तर द्यावे लागेल. मग, कुणाची मदतही भारताच्या कामी येणार नाही.

भारतासाठी धोका बनलाय चीन, हा 'खास' मित्र लवकरच देणार 33 फायटर जेट

भारताने गोळी चालवली, तर परिणाम भोगावे लागतील - चीनी माध्यमाने खुली धमकी देत लिहिले आहे, चिनी सैनिकंसोबत कराराचे नियम बदलने आणि गोळी चलवण्याची परवानगी दिल्याने भारताच्याच सुरक्षिततेला धोका निर्माण होईल. भारतीय लष्कराने गोळीबार केलाच, तर चिनी सैनिकही याचे उत्तर देतील. भारताने सीमेवर शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला, तर चीनही यात सहभागी होईल. मग भलेही चीन रणनीतीकदृष्ट्या घेरला गेलेला असेल, असेही ग्लोबल टाइम्सने म्हटले आहे.

India China Face Off : सुखोई ते मिराज, चीनचा सामना करण्यासाठी भारतानं तैनात केली शक्तीशाली लढाऊ विमानं

1996मध्ये दोन्ही देशांत करार -भारत आणि चीन यांच्यात 1996 मध्ये करार झाला आहे, की एलएसीच्या दोन किलोमिटर परिसरात दोन्ही देश गोळी चालवणार नाहीत अथवा स्फोटकांसह गस्तही घालणार नाहीत. तसेच गस्त घालतानाही दोन्ही देशांच्या सैनिकांकडे असलेल्या बंदुकांचे बॅरल जमिनीच्या दिशेने असेल. 

गलवानमध्ये अडकले भारतीय जवान; 'या' महत्वाच्या भागात 8 किमी आत घुसला चीन, बंकर्सही बनवले

टॅग्स :border disputeसीमा वादBorderसीमारेषाIndiaभारतchinaचीनNarendra Modiनरेंद्र मोदीIndian Armyभारतीय जवान