शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : चिनी हॅकर्सकडून कोरोनाच्या संशोधनासंबंधी माहिती चोरण्याचा प्रयत्न, अमेरिकेचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2020 07:34 IST

अमेरिकन वृत्तपत्र न्यूयॉर्क टाइम्सच्या मते, एफबीआय आणि होमलँड सिक्युरिटी मंत्रालयानं चिनी हॅकर्सविरुद्ध सतर्कतेचा इशारा दिला आहे.

ठळक मुद्देचीन कोरोना विषाणूची लस आणि उपचारांशी संबंधित माहिती चोरण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप अमेरिकेनं केला आहे.एफबीआय आणि होमलँड सिक्युरिटी मंत्रालयानं चिनी हॅकर्सविरुद्ध सतर्कतेचा इशारा दिला आहे.सार्वजनिक सतर्कतेचा मसुदा तयार करण्यात आला आहे आणि येत्या काही दिवसांत तो सार्वजनिक करण्यात येणार आहे.

वॉशिंग्टनः चीन कोरोना विषाणूची लस आणि उपचारांशी संबंधित माहिती चोरण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप अमेरिकन एजन्सी फेडरल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (एफबीआय) आणि सायबर सुरक्षा तज्ज्ञांनी केला आहे. अमेरिकन वृत्तपत्र न्यूयॉर्क टाइम्सच्या मते, एफबीआय आणि होमलँड सिक्युरिटी मंत्रालयानं चिनी हॅकर्सविरुद्ध सतर्कतेचा इशारा दिला आहे.सार्वजनिक सतर्कतेचा मसुदा तयार करण्यात आला आहे आणि येत्या काही दिवसांत तो सार्वजनिक करण्यात येणार आहे. अधिका-यांच्या म्हणण्यानुसार, चीनचे हॅकर्स कोरोना रुग्णांचे उपचार, तपासणी आणि लसीशी संबंधित डेटा आणि महत्त्वाची बौद्धिक संपत्ती चोरण्याच्या प्रयत्नात आहेत. तसेच हे हॅकर्स चिनी सरकारशी संबंध असल्याचंही सांगितलं जात आहे.ट्रम्प प्रशासनाच्या माजी आणि विद्यमान अधिका-यांनी सांगितले की, कोरोना (साथीच्या रोगाचा) लस निर्मितीमध्ये देशातील सरकारी आणि खासगी कंपन्यांचा सहभाग असल्याने हा इशारा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अमेरिकी अधिकाऱ्यांनी या लस निर्मितीसाठी प्रयत्नशील असलेल्या कंपन्यांना इराण, उत्तर कोरिया, रशिया आणि चीनमधील हॅकर्सबद्दल सतर्कता बाळगण्याची सूचना दिली आहे. अमेरिकन सुरक्षा एजन्सी सायबर हल्ल्यांविरुद्ध मोहीम राबवू शकते. या एजन्सींमध्ये पेंटागॉन सायबर कमांड आणि राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेचा समावेश आहे.गेल्या आठवड्यातच युनायटेड किंगडम आणि अमेरिकेने एक संयुक्त संदेश जारी केला होता, त्यामध्ये आरोग्यसेवेशी संबंधित लोकांना सायबर हल्ल्यांविरुद्ध सतर्कता बाळगण्याचं आवाहन केलं होतं. अमेरिका दीर्घ काळापासून कोरोना विषाणूची उत्पत्ती वुहानमध्ये झाल्याचा चीनवर आरोप करीत आहे. चीनने प्रथम जगभरात कोरोना पसरविला आणि त्यातून उद्भवणार्‍या परिस्थितीचा फायदा घेत असल्याचा आरोपही ट्रम्प प्रशासनाने केला. कोरोना विषाणूची उत्पत्ती चीनच्या वुहानमधील प्रयोगशाळेत झाली आहे आणि अमेरिकेकडे यासंदर्भात पुरेसे पुरावे आहेत, असंही अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पिओ यांनी सांगितले होते.

टॅग्स :Americaअमेरिकाcorona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीन