शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
3
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
4
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
5
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
6
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
7
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
8
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
9
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
10
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
11
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
12
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
13
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
14
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
15
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
16
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
17
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
18
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
19
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
20
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी

अद्भूत!!! वयाच्या १०५व्या वर्षी जगज्जेतेपद! ते आले, त्यांनी पाहिलं आणि ते 'चॅम्पियन' झाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 11:23 IST

या जगज्जेत्या युवकाचं नाव आहे, सवांग जनप्राम आणि त्यांचं वय आहे अवघं १०५ वर्षं!

ते आले, त्यांनी पाहिलं आणि ते जगज्जेते झाले! ही कहाणी आहे थायलंडच्या एका ॲथलिटची. तैपेई येथे नुकत्याच झालेल्या वर्ल्ड मास्टर्स गेममध्ये त्यांनी एक नाही, दोन नाही, तब्बल चार सुवर्णपदकं जिंकली आणि एक अनोखं रेकॉर्ड स्वत:च्या नावावर केलं. या जगज्जेत्या युवकाचं नाव आहे, सवांग जनप्राम आणि त्यांचं वय आहे अवघं १०५ वर्षं!

वयाची शंभरी गाठल्यानंतरही कार्यरत राहणं, मैदानावर असणं आणि जगज्जेतेपद मिळवणं ही सोपी गोष्ट नाही. त्यामुळेच सध्या या ज्येष्ठ तरुणाचं अख्ख्या जगात कौतुक होतंय. 

मुळात सवांग मैदानावर आले तेव्हाच ते जिंकले होते; कारण या वयात आयुष्य पाहणं आणि त्यातही मैदानावर लढायला सज्ज असणं हीच मोठी गोष्ट होती. अपेक्षेप्रमाणे त्यांच्या गटात त्यांना आव्हान द्यायला कोणीही स्पर्धक नव्हता. त्यांना गरज होती ती फक्त मैदानावर येऊन ती स्पर्धा पूर्ण करणं. 

सवांग यांनी शंभर मीटर धावणे, गोळाफेक, भालाफेक आणि थाळीफेक या स्पर्धांमध्ये भाग घेतला. शंभर मीटर धावण्याची स्पर्धा तर त्यांनी स्पर्धात्मक वेळेत म्हणजे ३८.५५ सेकंदांत पूर्ण केली! या वयात अनेकजण चालू, फिरू शकणं तर सोडाच; पण त्याच्या कितीतरी आधीच त्यांचं आयुष्य संपलेलं असतं. सवांग मात्र या प्रत्येक गोष्टीला अपवाद ठरले. 

आयुष्यभर ते कार्यरत असले तरी मुळात या स्पर्धात्मक जगात त्यांनी पाऊल ठेवलं, तेच मुळी वयाच्या नव्वदीनंतर! वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या आंतरराष्ट्रीय मास्टर्स स्पर्धांत त्यांनी आतापर्यंत साठपेक्षा जास्त पदकं मिळवलेली आहेत! शाळेत मुख्याध्यापक राहिलेले सवांग आजही शेतात जातात, शेतीचं काम पाहातात! खेळ खेळण्याची आणि स्पर्धात्मक खेळात आपला कस अजमावण्याची प्रेरणा त्यांना मिळाली ती त्यांच्या मुलीकडून. 

त्यांची ७३ वर्षीय मुलगी सिरीपान हीदेखील उत्तम खेळाडू आहे आणि तिनंही याच स्पर्धेत तीन सुवर्णपदकं पटकावली! वडिलांचं कौतुक करताना तिलाही शब्द कमी पडतात. सिरीपान म्हणते, ‘शिस्तीचं दुसरं नाव म्हणजे आमचे वडील! त्यांच्याप्रती आम्हाला असलेल्या अभिमानानं आकाश ठेंगणं होतं. त्यांचा स्वभाव पहिल्यापासूनच जिद्दी. जे करायचं ठरवलं ते करणारच. आजही एखादी गोष्ट करण्यापासून त्यांना कोणीच परावृत्त करू शकत नाही.’ 

या स्पर्धेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे २०२४ला झालेल्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जेवढ्या ॲथलिट‌्सनी भाग घेतला होता, त्याच्या दुपटीपेक्षाही जास्त ॲथलिट या स्पर्धेत सहभागी झाले होते. २०२४च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये साधारण १०,५०० ॲथलिट सहभागी झाले होते, तैपेईमध्ये झालेल्या वर्ल्ड मास्टर्स गेममध्ये सहभागी ॲथलिट‌्सची संख्या होती २५,९५० आणि सहभागी झालेले देश होते १०७!

सवांग यांना पाच मुलं असून नातू, पणतू, खापरपणतूंचे ते धनी आहेत. सवांग म्हणतात, ‘माझी मुलगी आंतरराष्ट्रीय दर्जाची ॲथलिट आहे, तिच्यामुळेच मला मैदानावर येण्याची प्रेरणा मिळाली हे तर खरंच; पण माझे अनेक मित्र, ओळखीचे, नातेवाईक... या साऱ्याच लोकांनी एकामागोमाग एक जग सोडलं, वय वाढत गेलं तसं अनेकांनी अंथरूण धरलं. वर्षानुवर्षे ते अजूनही अंथरुणावर आहेत, अनेक आजारांनी त्यांना घेरलेलं आहे आणि मृत्यूची ते वाट पाहताहेत, माझ्या बाबतीत असं काही होऊ नये याची काळजी मी घेतोय!’..

टॅग्स :World Trendingजगातील घडामोडीThailandथायलंड