Rahmanullah Lakanwal US White House firing: अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसीमध्ये झालेल्या गोळीबारात दोन नॅशनल गार्ड सदस्यांसह तीन जण गंभीर जखमी झाले. व्हाईट हाऊसपासून काही अंतरावरच ही गोळीबाराची घटना घडली. या गोळीबारामुळे घटनास्थळी गोंधळ उडाला. शहरातील सर्वात वर्दळीच्या भागांपैकी एक असलेल्या फरागुट स्क्वेअरजवळ ही घटना घडली. गोळीबार करणाऱ्याला अटक करण्यात आली आणि सध्या त्याची चौकशी सुरू आहे. नॅशनल गार्डचे जवान परिसरात गस्त घालत असताना त्याने गोळीबार सुरू केला. हल्लेखोर आधीच तिथे थांबला होता. संधी मिळताच त्याने गोळीबार केला. हा हल्लेखोर नेमका कोण आहे? याची माहिती समोर आली आहे.
गोळीबार करणारी व्यक्ती कोण?
या घटनेनंतर, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वॉशिंग्टन डीसीच्या सुरक्षेसाठी आणखी ५०० नॅशनल गार्ड जवान तैनात करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाबाबत, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सांगितले की हल्लेखोर जखमी झाला आहे, परंतु त्याला त्याच्या कृत्याची मोठी किंमत मोजावी लागेल. वॉशिंग्टन डीसीमध्ये नॅशनल गार्डवर गोळीबार करणाऱ्या संशयिताचे नाव रहमानउल्लाह लकनवाल असे सांगण्यात येत आहे. तो २९ वर्षांचा असून तो अफगाणिस्तानचा नागरिक आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, तो २०२१ मध्ये अमेरिकेत आला होता. अमेरिकन सैन्याने अफगाणिस्तानातून माघार घेतल्यानंतर काही अफगाणिस्तानींना अमेरिकेत आणण्यात आले होते. रहमानउल्लाह हा त्यापैकी एक आहे. रहमानउल्लाह लकनवाल याचे एक अफेसबुक पेज देखील आहे, ज्यावर अफगाण ध्वजाचा प्रोफाइल फोटो आहे. प्रोफाइल फोटोनुसार, तो वॉशिंग्टनमधील बेलिंगहॅम येथे राहत होता.
या घटनेवर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प काय म्हणाले?
ट्रम्प यांनी या प्रकरणावर सांगितले की गोळीबार करणारा व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे, त्याला त्याच्या या कृत्याची मोठी किंमत मोजावी लागेल. आम्ही आमच्या नॅशनल गार्ड्सच्या सोबत आहोत. सर्व लष्कराला आणि कायदा अंमलबजावणी संस्थांना देवाचे आशीर्वाद असू देत. मी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष म्हणून तुमच्यासोबत आहे.
Web Summary : In Washington D.C., a shooting injured three, including two National Guard members. The suspect, Rahmanullah Lakanwal, a 29-year-old Afghan national who entered the U.S. in 2021, is in custody. President Trump ordered 500 more National Guard troops for D.C. security.
Web Summary : वॉशिंगटन डी.सी. में गोलीबारी में दो नेशनल गार्ड सदस्यों सहित तीन घायल हो गए। संदिग्ध रहमानउल्लाह लकनवाल, एक 29 वर्षीय अफगान नागरिक, जिसने 2021 में अमेरिका में प्रवेश किया, हिरासत में है। राष्ट्रपति ट्रम्प ने डी.सी. सुरक्षा के लिए 500 और नेशनल गार्ड सैनिकों को तैनात करने का आदेश दिया।