'१२ तास काम'नंतर 'कामजीवन'; जॅक मा यांचा '669' फॉर्म्युला वाचून हातच जोडाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2019 15:58 IST2019-05-14T15:55:13+5:302019-05-14T15:58:04+5:30

अलिबाबाचे संस्थापक जॅक मा यांचा कर्मचाऱ्यांना सल्ला

Alibaba founder Jack Ma says staff should have sex six times in six days | '१२ तास काम'नंतर 'कामजीवन'; जॅक मा यांचा '669' फॉर्म्युला वाचून हातच जोडाल!

'१२ तास काम'नंतर 'कामजीवन'; जॅक मा यांचा '669' फॉर्म्युला वाचून हातच जोडाल!

नवी दिल्ली: आपल्या धोरणांमुळे कायमच चर्चेत राहणारे अलिबाबाचे संस्थापक जॅक मा यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना नवा सल्ला दिला आहे. काही दिवसांपूर्वी सकाळी 9 ते रात्री 9 काम करण्याचं सूत्र सांगणाऱ्या मा यांनी आता 669 चं सूत्र सांगितलं आहे. आठवड्यातल्या सहा दिवसात सहावेळा सेक्स करण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. यामुळे आयुष्य अधिक सुखकर होईल, असा दावा त्यांनी केला. डेली मेलनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.
 
जगातील प्रसिद्ध आणि श्रीमंत उद्योगपतींपैकी एक असलेल्या जॅक मा यांनी कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या सामूहिक विवाह सोहळ्यात बोलताना '669' चं सूत्र सांगितलं. 'माणसानं काम करताना 996 चं सूत्र लक्षात ठेवावं. आठवड्याचे सहा दिवस सकाळी नऊ ते रात्री नऊ असं बारा तास काम करावं. तर वैयक्तीक आयुष्यात 669 चं सूत्र अंमलात आणावं. आठवड्यातले सहा दिवस सहावेळा सेक्स करावा,' असं मा म्हणाले.  

54 वर्षांचे जॅक मा कंपनीतर्फे दरवर्षी सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन करतात. कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी या सोहळ्याचं आयोजन करण्यात येतं. 10 मे रोजी हा सोहळा आयोजित केला जातो. मा यांच्या '996' सूत्रावर तंत्रज्ञान उद्योगातून जोरदार टीका झाली होती. इतका वेळ काम करणं शक्य नसल्याचं मत या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केलं होतं. यानंतर आता मा यांच्या '669' सूत्रावर सोशल मीडियानं टीकेची झोड उठवली आहे. 996 सूत्र अंमलात आणल्यावर 669 साठी कोणाकडे वेळ आणि ऊर्जा शिल्लक राहील, असा सवाल अनेकांना उपस्थित केला आहे.
 

Web Title: Alibaba founder Jack Ma says staff should have sex six times in six days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.